हे काय नाटक आहे? मुख्यमंत्र्यांनी उपजिल्हाधिकारी हिवरेंना रस्त्यावरच झापलं

राज्यात व्हीआयपी संस्कृती आता चालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी या प्रकारानंतर सांगितले.
CM Himanta Biswa Sarma scolds IAS officer Nisarg Hivare for halting.
CM Himanta Biswa Sarma scolds IAS officer Nisarg Hivare for halting. Sarkarnama
Published on
Updated on

गुवाहाटी : राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून देण्यासाठी पोलिसांकडून इतर वाहने थांबविली जातात. त्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा (Traffic) सामना करावा लागतो. पण अशी वाहने थांबवून ठेवणं एका उपजिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलं. स्वत: मुख्यमंत्र्यांनी संबंधित उपायुक्तांना हे काय नाटक आहे? असं म्हणत रस्त्यावरच झापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात (social Media) व्हायरल झाला आहे.

आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himata Biswa Sarma) यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहने थांबवून ठेवली होती. त्यामुळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री चांगलेच भडकल्याचे व्हिडीओत दिसते. व्हीआयपी संस्कृती प्रोत्साहन दिल्याने मुख्यमंत्र्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना फटकारल्याने सोशल मीडियात त्याचे कौतुकही होत आहे.

CM Himanta Biswa Sarma scolds IAS officer Nisarg Hivare for halting.
जयंतरावांची बातच न्यारी! थेट एलॉन मस्कला धाडलं आमंत्रण

मुख्यमंत्री काही अधिकारी व नेत्यांसह रस्त्याने चालत जात असल्याचे व्हिडीओ दिसते. त्यावेळी त्यांना वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर त्यांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांनांच झापलं. 'डीसी साहेब हे काय नाटक आहे? गाड्या का थांबवल्या आहेत. कोणी राजा, महाराजा येत आहेत का? असं करू नका. लोकांना त्रास होत आहे. वाहनाना जाऊ द्या,' असं मुख्यमंत्री सरमा उपजिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सर्व वाहतूक खुली केली जाते. ही घटना आसाममधील नागांव जिल्ह्यातील गुमोथा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग 37 वर घडली. उपजिल्हाधिकारी निसर्ग हिवरे (Nisarg Hivare) यांनी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली होती. पण जेव्हा मुख्यमंत्री तिथे पोहचले तेव्हा त्यांना मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. हे पाहून त्यांनी आपली गाडी थांबवत खाली उतरले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले. हिवरे हे मुळचे महाराष्ट्रातील असून 2015 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचे समर्थन केले. ते म्हणाले, माझ्या भेटीवेळी सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणी होऊ नयेत, अशी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर वाहतूक थांबवण्यात आल्याने मी अधिकाऱ्यांना फटकारलं. राष्ट्रीय महामार्ग जवळपास 15 मिनिटे बंद होता. त्यात रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या. ही व्हीआयपी संस्कृती आता आसाममध्ये चालणार नाही, असे सरमा यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com