Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Jagdeep Dhankhar Admitted : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रुग्णालयात दाखल, अचानक बेशुद्ध पडले अन्...

Jagdeep Dhankhar Admitted to AIIMS : धनखड हे 75 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांना प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

Roshan More

Jagdeep Dhankhar News : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांची अचनाक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांची प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

धनखड हे 75 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांना प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या डाॅक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

धनखड हे राजस्थानचा आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा जनता दल, काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला आहे.

जनता दलाकडून ते लोकसभेचे खासदार होते. 1991 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अजमेर लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

राजस्थान विधानसभेत ते आमदार म्हणून विजयी झाले होते. दरम्यान, 2003 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जुलै 2019 मध्ये त्यांची नियुक्ती पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती.

उपराष्ट्रपती म्हणून निवड

2022 मध्ये एनडीएकडून उपराष्ट्रपदीचे उमेदवार होते. त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, जुलै 2025 मध्ये त्यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला होता. मात्र, यावरून मोठा राजकीय वाद झाला होता. विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधत त्यांनी जबरदस्तीने राजीनामा घेतला असल्याचे म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT