Bjp News: भाजपला निवडणुकीआधीच मोठा धक्का! ऐन दिवाळीतच डबल धमाका; दोन बडे नेते पक्षाला लवकरच सोडचिठ्ठी देणार !

BJP faces internal rebellion News : निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bjp News : उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेले नेते थेट पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतराची शक्यता आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपमधील दोन बड्या नेत्यांनी बंडाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे येत्या काळात उमेदवारी मिळण्याच्या अटीवर अनेक बडे नेते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. लवकरच ते पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांमध्ये पक्षांतराची चर्चा जोरात सुरु आहे. अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात मंत्री आणि विधान परिषद सदस्य राहिलेले साहब सिंग सैनी यांनी २०२३ मध्ये भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला होता. आता पुन्हा समाजवादी पक्षात परत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सैनी यांचा त्यांच्या समाजात मोठा प्रभाव असल्याने समाजवादी पक्षाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी याआधी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरून पक्षातील काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशास अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपूरमधून बसपचे (Bsp) उमेदवार मजिद अली देखील लवकरच पक्ष बदलणार असल्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी देवबंदचे माजी आमदार मविया अली यांच्यासोबत अखिलेश यादव यांची भेट घेतली. ते लवकरच आपल्या समर्थकांशी चर्चा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे लवकरच त्यांच्या प्रवेशाची शक्यता आहे.

BJP
Hasan Mushrif: गोकुळच्या अध्यक्षपदाचा वाद थेट कोर्टात, मुश्रीफ नेमकं काय म्हणाले पाहा

देवबंदमध्ये माविया अली यांनी समाजवादी पक्षात नवीन नेत्यांना आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यामुळे त्यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. दुसरीकडे, बहुजन समाज पक्षातून समाजवादी पक्षात आलेले माजिद अली यांनीही या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पेच निर्माण झालेला आहे.

BJP
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळलेले चौधरी नीरपाल हे आरएलडीच्या क्रीडा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २०१२ ते २०१७ या काळात समाजवादी पक्षाशी (एसपी) संबंधित असलेले हे जाट नेते पुन्हा पक्षात परतल्यामुळे, पश्चिम उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. देवबंद आणि नकुर विधानसभा मतदारसंघांतील सहारनपूरमधील दोन महत्त्वाच्या जागांच्या उमेदवारीबाबतची परिस्थिती अजूनही गुंतागुंतीचीच आहे.

BJP
NCP president : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण होणार? पदाचा इतिहास एका क्लिकवर...

नकुरमध्ये २०२२ मध्ये भाजप सोडून समाजवादी पक्षात सहभागी झालेले डॉ. धर्म सिंग सैनी यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यावर, नाराज होऊन साहिल खान यांनी बहुजन समाज पक्षात प्रवेश केला होता. आता, साहिल खान पुन्हा एकदा नकुर मतदारसंघात लोकांमध्ये सक्रिय झाले असून, समाजवादी पक्षाच्या उमेदवारीसाठी आपला दावा मांडत आहेत. त्यामुळे आता याठिकाणी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.