Jagdeep Dhankhar Pension: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी माजी आमदार म्हणून पेन्शनसाठी अर्ज केल्याचं वृत्त समोर आलं आहे. बंगालचे राज्यपाल आणि नंतर उपराष्ट्रपती बनल्यानंतर त्यांची पेन्शन बंद करण्यात आली होती. ही पेन्शन पुन्हा मिळावी यासाठी त्यांनी आता नव्यानं अर्ज केला आहे. विशेष म्हणजे ज्या आमदारकीच्या कार्यकाळासाठी त्यांनी अर्ज केला आहे, त्या काळात ते काँग्रेसचे आमदार होते.
जगदीप धनखड यांनी राजस्थानचे माजी आमदार या नात्यानं पेन्शनसाठी अर्ज केला आहे, असं वृत्त टाईम्स नाऊनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. धनखड यांनी १९९३ ते १९९८ या काळात काँग्रेसचे आमदार म्हणून किशनगढ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. जुलै २०१९ पर्यंत त्यांना या आमदारकीसाठी म्हणजेच माजी आमदार म्हणून पेन्शनही मिळत होती. पण पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची मोदी सरकारनं नियुक्ती केल्यानंतर त्यांची माजी आमदार म्हणून मिळणारी पेन्शन बंद करण्यात आली होती. त्यानंतर २०२२ मध्ये ते उपराष्ट्रपती बनले. त्यानंतर २१ जुलैर २०२५ रोजी त्यांनी तडकाफडकी प्रकृती अस्वास्थाचं कारण देत आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, आता धनखड हे राज्यपाल आणि उपराष्ट्रपती नसल्यानं त्यांचे या पदासाठीचे सर्व मानधनासह भत्ते बंद झाले आहेत. त्यामुळं त्यांनी राजस्थानच्या माजी आमदार या नात्यानं आपली स्थगित केलेली पेन्शन पुन्हा नव्यानं सुरु करावी यासाठी त्यांनी राजस्थान विधानसभा सचिवालयात नव्यानं अर्ज सादर केला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ७४ वर्षीय धनखड हे माजी आमदार या नात्यानं ४२,००० रुपये प्रति महिना इतकी पेन्शन मिळण्याचे हक्कदार आहेत.
धनखड यांच्या अर्जावर सचिवालयानं कार्यवाही देखील सुरु केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. त्यांना ही नव्यानं पेन्शन त्यांचा उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्याच्या तारखेपासून लागू होईल. राजस्थानमध्ये माजी आमदार म्हणून पहिल्यांदा पेन्शन ३५,००० रुपये प्रति महिना इतकी मिळते. त्यानंतर पुढचा कार्यकाळ आणि वयानुसार ही पेन्शन वाढत जाते. तसंच ७० वर्षांपुढे जर वय असेल तर या पेन्शनमध्ये २० टक्क्यांनी वाढ देखील होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.