Bihar Political Crisis, RJD Latest News, AIMIM News
Bihar Political Crisis, RJD Latest News, AIMIM News Sarkarnama
देश

बिहारमध्येही राजकीय भूकंप; ओवेसींना मोठा धक्का, पाचपैकी चार आमदार फुटले

सरकारनामा ब्युरो

पाटणा : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर आता बिहारमध्येही राजकारण तापलं आहे. 'एआयएमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पाचपैकी चार आमदार फुटले असून त्यांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये (RJD) प्रवेश केला. त्यामुळे तेजस्वी यादव यांची ताकद वाढली आहे. (Bihar Political Crisis)

'एमआयएम'चे (AIMIM) अमौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अख्तरूल ईमान, बायसी मतदारसंघातील सय्यद रुकनुद्दीन अहमद, जोकीहाटचे शाहनवाज आलम आ, कोचधामनचे मोहम्मद इजहार असफी, बहादुरगंजचे मोहम्मद अंजार नईमी विधानसभेत दाखल झाले होते. त्यापैकी चार जणांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या उपस्थितीत या आमदारांनी पक्षप्रवेश केला.

अख्तरूल ईमान हे एकटे आता पक्षासोबत असून उर्वरित चौघांनी ओवेसी यांची साथ सोडली. मागील निवडणुकीत एमआयएमने जोर लावला होता. या निवडणुकीत पक्षाला सीमांचल भागामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. या भागात एकूण 24 मतदारसंघ आहेत. बहुतेक मतदारसंघ मुस्लिमबहूल आहेत.

या भागात आरजेडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना संधी असल्याचे सांगितले जात होते. पण एमआयएमने दोन्ही पक्षांना जोरदार धक्का दिला होता. आता आरजेडीने त्याची भरपाई केल्याची चर्चा बिहारमध्ये रंगली आहे. पाचपैकी चार आमदार फोडून तेजस्वी यादव यांनी ओवेसींना धक्का झटका दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT