Parliament House Latest News, Parliament Monsoon Session
Parliament House Latest News, Parliament Monsoon Session sarkarnama
देश

Congress : अखेर ओम बिर्ला संतापले अन् काँग्रेसच्या चार खासदारांना दाखवला बाहेरचा रस्ता

सरकारनामा ब्युरो

Parliament Monsoon Session

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारवेर धरले आहे. महागाईच्या मुद्यावरून विरोधकांकडून सभागृहाचे कामकाज सुरू होताच जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तसेच सरकारविरोधी फलकही झळकावले जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी सातत्याने विरोधी खासदारांना संसदेत फलक न आणण्याची ताकीद दिली होती. पण हा प्रकार थांबत नसल्याचे पाहून सोमवारी बिर्ला हे चांगलेच संतापले.

बिर्ला यांनी या प्रकारानंतर सोमवारी काँग्रेसच्या (Congress) चार खासदारांना निलंबित केले. त्यामध्ये मणिकम टागोर, रम्या हरिदास, जोतिमनी आणि टी. एन. प्रतापन यांचा समावेश आहे. पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्का आहे.

विरोधकांच्या गोंधळामुळे सोमवारी लोकसभेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय येत होता. त्यामुळे लोकसभेचे कामकाज मंगळवारपर्यत स्थगित करावे लागले. ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याआधी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अध्यक्षांनी मनाई करून गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर कारवाईची मागणी केली.

विरोधकांकडून वाढती महागाई, आवश्यक वस्तूंवर लावलेला जीएसटी या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. या मुद्दांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत येऊन उत्तर द्यायला हवे, अशी त्यांची मागणी आहे. पावसाळी अधिवेश 18 जुलै सुरू झाले असले तरी दररोज विरोधकांकडून विविध मुद्यांवर गोंधळ घातला जात असल्याने कामकाज सातत्याने स्थगित करावे लागत आहे.

त्यामुळे सोमवारी बिर्ला यांनी सदस्यांना चांगलेच धारेवर धरलं. ते म्हणाले, मी शांत आहे याचा वेगळा अर्थ काढू नये. मी तीन वाजल्यानंतर संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण जर फलक दाखवायचे असतील तर तीन वाजल्यानंतर सभागृहाच्या बाहेर दाखवावेत. सभागृहाचे कामकाज चालावे, हे देशाच्या जनतेला हवं आहे. त्यामुळे सभागृहात अशी स्थिती राहू देणार नाही, असंही बिर्ला यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT