मुंबै बँक निवडणूक प्रकरण : प्रवीण दरेकरांची न्यायालयातून बिनशर्त माघार

प्रवीण दरेकर यांनी अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले होते.
BJP MLA Pravin Darekar Latest News
BJP MLA Pravin Darekar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबै बँकेच्या निवडणुकीदरम्यान मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका भाजपचे (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी बिनशर्त मागे घेतली आहे. आता त्यांना सहकार मंत्र्यांकडे दाद मागावी लागेल. जून महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दरेकरांना न्यायालयात धाव घेण्याऐवजी सहकार मंत्र्याकंडे दाद मागा, असं सुनावलं होतं. (Praveen Darekar Latest News)

मुंबै बँकेच्या निवडणुकीदरम्यान (Election) दरेकर अडचणीत आले. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.

BJP MLA Pravin Darekar Latest News
Arjun Khotkar : गेले खोतकर कुणाकडे? शिंदे गट म्हणतोय, आम्हाला पाठिंबा अन् ते म्हणतात...

त्याविरोधात दरेकरांनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेला सरकारने विरोध करून ती फेटाळण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने दरेकरांना सहकार विभागाकडे दाद का मागितली नाही, असा सवाल केला होता. तसेच सोसायटीची बाजू ऐकून घेण्यासाठी प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.

याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी आपली याचिका बिनशर्त मागे घेण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दरेकर यांना सहकार मंत्र्यांकडे दाद मागावी लागेल.

BJP MLA Pravin Darekar Latest News
Shiv Sena : अर्जुन खोतकरांचाही ठाकरेंना चकवा; दिल्लीत शिंदे गटात झाले सामील?

दरम्यान, कामगार असल्याचा दावा करून दरेकर हे 1999 मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. त्यांनी 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह 91 लाख रुपयांची रोकड होती. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते, असे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दरेकरांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com