Accident on Yamuna Expressway Latest Marathi News
Accident on Yamuna Expressway Latest Marathi News Sarkarnama
देश

यमुना एक्सप्रेसवेवरील अपघातात बारामतीतील चार जणांचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील (Maharashtra) चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला बेळगाव येथील आहे. हे सर्व जण बारामतीचे (Baramati) असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरूवारी पहाटे हे सर्व जण प्रवास करत असलेली बोलेरो गाडी एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Yamuna Expressway Accident Latest Marathi News)

एक्सप्रेसवेवरील जेवार टोलनाक्याच्या अलीकडे पहाटे पाच वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातात चंद्रकांत बुराडे (६८), स्वर्णा बुराडे (५९), मालन कुंभार (६८), रंजना पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३, कर्नाटक) यांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुजावर या कर्नाटकातील बेळगावमधील आहेत.

जखमींमध्ये सातारा येथील नारायण रामचंद्र कोळेकर (40) आणि बेळगावमधील सुनिता राजू गस्ते यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त वाहनामध्ये सात जण होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाहन चालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून गाडी ट्रकला धडकली.

अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. दरम्यान, गुरूवारी झालेल्या अपघातातील मृतांचे मृतदेह नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. अद्याप अपघाताबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT