Narrendra Modi, Terror Attack Sarkarnama
देश

Modi Government : मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये दहशतवादी हल्ले थांबेनात; महिनाभरात 12 जवान शहीद

Terror Attack Jammu and Kashmir : लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सोमवारी एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत.

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या सुरूवातीलाच दहशतवाद्यांनी जणू धुडगुस घातला आहे. मागील महिनाभरात जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे सरकारसह लष्कराची चिंता वाढली आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर पहिल्याच दिवशी भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झाला. तर 41 जण जखमी झाले आहेत.

हे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. सोमवारी लष्कर आणि दहशतवाद्यांची चकमक झाली. त्यामध्ये चार जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

असे झाले हल्ले

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथील एका गावात 11 जूनला दहशतवादी लपले होते यावेळी सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर लष्कराने शोधमोहिम हाती घेतली होती. यादरम्यान हीरानगर सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला.

डोडा जिल्ह्यात 12 जूनला झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर 6 जुलैला कुलगाम येथील दोन गावांत झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. दुसऱ्याच दिवशी राजौरीमध्ये लष्कराच्या शिबीरावर हल्ला झाला. यामध्ये एक जवान जखमी झाला होता. 

कठुआ जिल्ह्यातच 8 जुलैला लष्करी जवानांना लक्ष्य करण्यात आले होते. जवानांच्या वाहनावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये 10 जुलैला दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश मिळाले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT