ATS Sarkarnama
देश

Gujrat ATS News : खळबळजनक! अहमदाबाद विमानतळावर 'ISIS'च्या चार दहशतवाद्यांना 'ATS'ने केली अटक!

सरकारनामा ब्यूरो

Gujarat Terrorist News: एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडत आहे. तर दुसरीकडे गुजरातमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील अहमदाबाद विमानतळावर इस्लामिक स्टेट (ISIS)च्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे चारही दहशतवादी श्रीलंकन नागरिक असल्याची माहितीही समोर आली आहे. गुजरात दहशतवाद विरोधी (ATS)कडून ही कारवाई केली गेली आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एटीएसने अलकायदाशी संबंधित आरोपात राजकोटमधून तीन लोकांना अटक केली होती. प्राथमिकदृष्ट्या ते प्रतिबंधित दहशतवादी संघटनेसाठी लोकांना कट्टरपंथी बनवणे आणि भरती करण्यासाठी एका बांग्लादेशी हस्तकासाठी काम करत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहमदाबादच्या प्रकरणाबाबत गुजरात डीजीपी विकास सहाय यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली होती की, चार जण मोहम्मद नुसरत, मोहम्मद नुफ्रान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद राजदीन हे श्रीलंकन नागरिक आहेत. ते प्रतिबंधित दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे सक्रीय सदस्य आहेत. सर्वजण आयएसआयएसच्या विचारधारेचे कट्टरपंथी आहेत. ते दहशतवादी हल्ला घडण्याच्या उद्देशाने भारतात आले होते.

गुजरात पोलिसांच्या एटीएसने दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएस या सर्व दहशतवाद्यांना गुप्त ठिकाणी नेऊन त्यांची चौकशी करण्यात व्यस्त आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने पोहोचले? याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या वर्षी पोलिसांनी पोरबंदरमधून ISIS साठी काम करणाऱ्या काही संशयितांना अटक केली होती. त्यानंतर आयएसच्या इंडिया मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT