Baramulla Constituency : देशातील सर्वात संवेदनशील मतदारसंघ 'बारामुल्ला'मध्ये यंदा बंपर मतदान!

Baramulla Voting : वर्षानुवर्षे दहशतवादी कारावाया घडत असल्याने आतापर्यंत जनता होती प्रचंड दहशती खाली, मात्र ...
Baramulla Voting
Baramulla Voting Sarkarnama

Lok Sabha Election Jammu and Kashmir : देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, बंगालमधील सात, बिहार आणि ओडिशातील प्रत्येकी पाच, झारखंडमध्ये तीन तर लडाख व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होत आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये रायबरेलीत राहुल गांधी (Rahul Gandhi), अमेठीत स्मृती इराणी, लखनऊमध्ये राजनाथ सिंह यांच्यासह पियुष गोयल, श्रीकांत शिंदे, चिराग पासवान, भारती पवार, कपिल पाटील, ओमर अब्दुल्ला आदींचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramulla Voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE : दिंडोरीत सर्वाधिक मतदान, कल्याण, ठाणे, नाशिक अन् मुंबई उपनगरात किती?

पाचव्या टप्प्यात देशातील सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातही मतदान पार पडत आहे. विशेष बाब म्हणजेय यंदा बारामुल्लामध्ये मोठ्याप्रमाणावर मतदान होत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा येथील मतदानाचा टक्का चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला(Omar Abdullah) निवडणूक रिंगणात आहेत. तर पीडीपी कडून फयाद अहमद मीर हे निवडणूक लढवत आहेत.

दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी 44.9 टक्के मतदान झाले होते. या अगोदर 2019मध्ये इथे केवळ 34.57 टक्के मतदान झाले होते. अशी शक्यता वर्तवली जात आहे की मतदान संपल्यानंतर येथे झालेल्या मतदानाचा टक्का 50 टक्क्यांच्या पुढे गेलेला असेल.

Baramulla Voting
Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी 'गुगल'नं बनवलं खास 'डुडल'

सर्वात संवेदनशील मतदारसंघ -

खरंतर बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ देशातील सर्वात संवेदनशील असा भाग आहे. या ठिकाणी प्रदीर्घ काळापासून दहशतवादी कारवाया घडत आलेल्या आहेत, त्यामुळे येथील जनता कायमच काहीशी दहशतीत राहिली आहे. परिणामी या ठिकाणी मतदानाचा टक्का कायमच कमी होता. मात्र आता वातावरण पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले आहेत.

2019मध्ये केंद्रातील मोदी सरकारने राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम 370 हटवले आहे. यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासीत प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख असे विभाजन झाले. जम्मू-काश्मीरची विधानसभा सुद्धा बरखास्त केले गेली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com