France Student Protest Sarkarnama
देश

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; 560 शाळांबाहेर आंदोलन, 1,900 हून अधिक अटक

French students protest poor school conditions, teacher shortages and lack of resources as unrest spreads nationwide : शिक्षकांची कमतरता, खराब शाळा आणि सुविधांचा अभाव याविरोधात विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप; आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांशी झटापट

Pradeep Pendhare

France school crisis : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) या उपहासात्मक आंदोलनाकडून देशात 'स्कूल ठीक करो', अभियान सुरू आहे. या अभियानादरम्यान 'सीजेपी'च्या पदाधिकाऱ्यांवर काही ठिकाणी हल्ले देखील झाले.

तत्पूर्वी नीट पेपर फुटीप्रकरणात जंतरमंतर 'सीजेपी'ने केलेल्या आंदोलनाचा दबावातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सुमारे 36-37 दिवस सुरू असलेल्या या आंदोलनामुळे देशासह जगाला 'जेन-जी'ची ओळख झाली. 'जेन-जीं'च्या अधिकारांवर जगभरात चर्चा होत असताना, फ्रान्समध्ये देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाच्या वानव्याने संपूर्ण देश व्यापला आहे.

फ्रान्समधील हे आंदोलन शिक्षण (Education) व्यवस्थेतील गुणवत्तेसाठी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. आजची शिक्षण व्यवस्था तुलनेत खूप मागे आहे, शाळांमध्ये कर्मचारी अन् शिक्षकांचा अभाव, खराब इमारती, आवश्यक सुविधांची वानवा, सकाळी आठला सुरू झालेली शाळा उशिरापर्यंत चालते, विद्यापीठ प्रवेशाची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि शाळांसह महाविद्यालयातही सुविधेंच्या अभावावर आहे.

फ्रान्स देशभरातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी (Student) निदर्शने, रास्ता रोको आणि शाळांच्या प्रवेशद्वारांवर अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कचऱ्याच्या ढिगांना आग लावणे, तोडफोड आणि पोलिसांशी झटापटीच्या घटना घडल्या आहेत. देशातील 560 शाळांबाहेर आंदोलन झाल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली. फ्रान्समधील आंदोलनाचे पडसाद शेजारील बेल्जियममध्येही उमटले आहेत. लीज शहरात झालेल्या हिंसाचारानंतर सुमारे डझनभर शाळा बंद ठेवण्यात आल्या.

गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी एक हजार 900 हून अधिक जणांना अटक केली, तर 305 पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला; तसेच अनेकांना ताब्यात घेतले.

सरकारने आंदोलकांचे अधिकार मान्य करताना, शाळांचे प्रवेशमार्ग रोखणे, जाळपोळ, तोडफोड आणि हिंसाचार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. फ्रान्समध्ये पुढील वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने विद्यार्थी आंदोलनाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास घटनात्मक मर्यादा आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये हे आंदोलन महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT