Vikhe Patil controversy : नीला विखे पाटलांंना विखे पिता-पुत्रांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, "आम्ही फटाके फोडले की फ्लेक्स लावले?"

Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil : "नीला विखे पाटील या स्वीडनच्या खासदार झाल्या, हा विषय आम्हाला माहिती नव्हता. मात्र, काही पत्रकारांनी विचारलं की, 'नीला विखे पाटील स्वीडनच्या खासदार झाल्या, त्यावर तुमची काय भावना आहे?' तेव्हा कोणीही असेल तर आपण असं म्हणणार का की फार वाईट झालं? असं तर म्हणू शकत नाही."
Sujay and Radhakrishna Vikhe Patil , Neela Vikhe Patil
Sujay Vikhe Patil and Radhakrishna Vikhe Patil responded to Neela Vikhe Patil's remarks regarding her Sweden Parliament election.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Vikhe Patil family controversy : स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कौतुक केलं होतं. मात्र, त्यानंतर नीला यांनी थेट, "गेल्या दशकभरात ज्यांच्याशी माझा कोणताही संबंध राहिलेला नाही, ते माझ्या राजकीय यशाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात," अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती.

याच टीकेला आता विखे पिता-पुत्रांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "नीला विखे पाटील या स्वीडनच्या खासदार झाल्या, हा विषय आम्हाला माहिती नव्हता. मात्र, काही पत्रकारांनी विचारलं की, 'नीला विखे पाटील स्वीडनच्या खासदार झाल्या, त्यावर तुमची काय भावना आहे?' तेव्हा कोणीही असेल तर आपण असं म्हणणार का की फार वाईट झालं? असं तर म्हणू शकत नाही.

आम्ही एका कुटुंबात राहिलेलो आहोत. त्या अनुषंगाने कुटुंबाचा एक सदस्य खासदार झाला असेल, तर आम्हाला आनंद आहे, मी एवढंच बोललो," अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. शिवाय, "आपण कार्यकर्त्यांसमोर भाषण करत असताना मी मार्मिकतेने बोलत होतो. यामध्ये कोणाचं श्रेय घेण्याचा प्रश्न कुठे येतो? त्या स्वतःच्या कर्तृत्वाने तिकडे काम करत आहेत, आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने इकडे काम करत आहोत," असंही सुजय विखे पाटील म्हणाले.

Sujay and Radhakrishna Vikhe Patil , Neela Vikhe Patil
Drought Survey : दुष्काळाच्या पंचनाम्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना; कशी असणार कार्यपद्धती? वाचा सविस्तर

तर एका कौटुंबिक विषयाचं एवढं मोठं राजकारण व्हावं आणि त्यावर सर्वांनी विश्लेषण करावं, हे खेदजनक असल्याची नाराजी व्यक्त करत सुजय विखे पाटील म्हणाले, "नीला विखे तिकडे खासदार झाल्या, ही माहिती आम्ही इकडे पत्रकार परिषद घेऊन दिली का? आम्ही फटाके फोडले का? आम्ही काय फ्लेक्स बोर्ड लावले का? की आम्ही त्यांचा जाहीर सत्कार ठेवला? नाही." असं म्हणत त्यांनी हा विषय इथेच थांबवण्याचं आवाहन केलं.

Sujay and Radhakrishna Vikhe Patil , Neela Vikhe Patil
Shivsena UBT : दुष्काळातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्यात 'मदत केंद्र' उघडणार

दरम्यान, या घटनेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी नीला विखे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी, "तो आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. आम्ही अंतर्गत पाहू काय करायचं ते," असं म्हणत अधिक बोलणं टाळलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com