Uttar Pradesh  Sarkarnama
देश

Uttar Pradesh : मोठी बातमी! गँगस्टर अतिक अहमद अन् अश्रफ अहमदचा गोळीबारात मृत्यू

Atiq Ahmed News : अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दोन-तीन जणांनी केलेल्या गोळीबारात या दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराज या ठिकाणी वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना अतिक अहमद आणि अश्रफ अहमदची हत्या झाल्याचे वृत्त आहे.

अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे.

अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर दोन दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचा एनकाउंटर झाला होता.

अतिक अहमद 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातही प्रमुख आरोपी होता.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT