Supreme Court : सत्तासंघर्षाचा निकाल कधी? सर्वोच्च न्यायालयातील वकिलाने सांगितली तारीख अन् 'या' शक्यता...

ShivSena News : सर्वोच्च न्यायालयाने प्रदिर्घ सुनावणीनंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySarkarnama

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) प्रदिर्घ सुनावणीनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी या संदर्भात भाष्य केले आहे.

वकील शिंदे यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, न्यायालयाचा निकाल कधी येईल, हे सांगणे कठीण असले तरी सुद्धा 15 मेच्या आधी हा निकाल येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने निकाल राखून ठेवला होता. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Rajasthan Politics : सचिन पायलटांसमोर काँग्रेसने ठेवली ऑफर्सची जंत्री?; धुडकावून लावत स्पष्ट केली भूमिका!

सरासरी एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिनाचा अवधी लागतो. जास्तीत जास्त किती कालावधी लागेल याची काही शाश्वती देता येत नाही. मात्र, महाराष्ट्राच्या खटल्यामध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने निकाल त्या आधी म्हणजे 15 मे पर्यंत लागेल.

सर्वोच्च न्यायालयात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार आहे हे आदल्या दिवशीच समजते. न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जेव्हा लागेल त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 15 मेच्या आधी हा निकाल येणार हे तर निश्चित, असल्याचे शिंदे म्हणाले. निकालासंदर्भात शिंदे यांनी अनेक शक्यता व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालय थेट १६ आमदारांच्या निलंबणावर आदेश देणार नाही. न्यायालय हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठऊ शकते, आणि त्यांना वेळेचे बंधन घातले जाऊ शकते, अशी शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत, त्यामुळे हे प्रकरण सात किंवा नऊ न्यायाधीशांच्या खंडापीठाकडेही जाऊ शकते, असेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Uttar Pradesh : मोठी बातमी! मुलानंतर गँगस्टर अतिक अहमद अन् भाऊ अश्रफ अहमदचाही एन्काऊंटर

न्यायालय राज्यापालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढू शकते. राज्यपालांच्या भूमिकेबद्दल न्यायालय भाष्य करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

१६ आमदारांच्या कृतीवरही न्यायालय ताशेरे ओढू शकते. न्यायालय १६ आमदारांना अपात्र ही करु शकते, अशीही शक्यता शिंदे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com