Adani Ports executive change : उद्योगपती गौतम अदानी यांनी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या कंपनीचे कार्यकारी अध्यक्षपद सोडले आहे. त्यांच्याकडे आता कमी महत्वाचे बिगर कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. APSEZ ही अदानी ग्रुपमधील सर्वात महत्वाची कंपनी मानली जाते. त्यामुळे अदानींच्या कार्यकारी अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाला महत्व प्राप्त झाले. त्याबाबत काँग्रेसने अनेक मुद्द्यांवरून त्यांना घेरले आहे.
काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियात याबाबत एक पोस्ट केली आहे. अदानी यांचा राजीनामा देण्याला का महत्व आहे, याबाबत त्यांनी म्हटले आहे की, APSEZ ही भारतातील सर्वात मोठी खासगी बंदरांचे संचलन करणारी कंपनी आहे. भारताच्या एकूण बंदरे व्यापारातील या कंपनीचा हिस्सा 28 टक्के आहे. APSEZ ही अदानी ग्रुपमधील सर्वाधिक मुल्यवान लिस्टेड कंपनी आहे.
कायदेशीर उलथापालथ सुरू असताना राजीनामा
कायदेशीर उलधापालथ सुरू असताना अदानी यांनी राजीनामा दिल्याचे श्रीनेत यांनी म्हटले आहे. अदानी कंपन्यांनी मुंद्रा बंदराच्या माध्यमातून इराणी एलपीजी आयात केला की नाही, जो आंतराष्ट्रीय प्रतिबंधांचे उल्लंघन करणारे आहे, याची चौकशी अमेरिकेद्वारे केली जात आहे, असे श्रीनेत यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हिंडनबर्ग रिसर्चद्वारे करण्यात आलेले 250 मिलियन डॉलरची लाच आणि फसवणुकीचे आरोप, ज्याची आता अमेरिकी एसईसी चौकशी करत आहे. त्याचप्रमाणे अदानी समूहावर अमेरिकी गुंतवणुकदारांना चुकीची माहिती देऊन फंडिग गोळा करणे आणि अब्जावधी डॉलरचे ऊर्जा करार करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना च देण्याचे आरोप असल्याचेही श्रीनेत यांनी म्हटले आहे.
जागितक स्तरावर व्यापक प्रभाव
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी जागतिक स्तरावरील व्यापक प्रभावावरही भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, केनिया सरकारने अदानींच्या 2.6 बिलियन डॉलरचे दोन करार रद्द केले आहेत. अमेरितील इन्स्टिट्युशनल गुंतवणुकदार अदानी समुहातील आपल्या भागिदारीचे पुनर्मुल्यांकन करत आहेत. श्रीलंकाने अदानी समुहाचा वीज खरेदीचा करार रद्द केला आहे. ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि इराणनमध्ये अदानी यांच्या विरोधात चौकशी आणि विरोध सुरू असल्याचा दावा श्रीनेत यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.