Alliance of Uddhav-Raj Thackeray : अखेर ठाकरे बंधुंनी करून दाखवलं! युती झाली, पहिली परीक्षा 18 ऑगस्टला

Background of The Best Employees Co‑op Credit Society : मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात महत्वाची मानली जात आहे. यापार्श्वभूमीवर युतीची पहिली घोषणा मुंबईतच झाली आहे.

मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली आहे. या दोन्ही संघटनांचे उत्कर्ष पॅनल एकत्रित निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे.

उत्कर्ष पॅनलचे एक पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच इतर पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत. उत्कर्ष पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यांमध्ये युतीबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होते, असे समजते.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवईंचा मोठा निर्णय; सिब्बल, सिंघवींसह सिनिअर वकिलांना यापुढे करता येणार नाही ‘हे’ काम...

बेस्टची निवडणूक म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. पतपेढीवर सध्या उद्धव ठाकरेंच्या संघटनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता त्यांच्यासोबत राज ठाकरेंची सेनाही आली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्कर्ष पॅनल विरोधकांना धक्का देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
RBI vs Donald Trump : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी परतवला ट्रम्प यांचा जिव्हारी लागणारा वार; खिल्ली, धमक्यांवरूनही ठणकावलं...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप महापालिका निवडणुकीसाठी अधिकृतपणे युतीची घोषणा केलेली नाही. मात्र, दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. बेस्टमधील निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधुंनी एकत्रित येत पालिका निवडणुकीतही युती होणार असल्याचेच संकेत दिल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com