gautam gambhir sarkarnama
देश

Gautam Gambhir News : जय हिंद! गौतम गंभीर यांचा राजकारणाला 'रामराम'; मोदी, शाह अन् नड्डांना म्हणाले...

Gautam Gambhir Quit Bjp : आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं गंभीर यांनी स्पष्ट केलं आहे.

Akshay Sabale

काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election 2024 ) पडघम वाजू शकतात. देशातील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. भाजपच्या ( bjp )उमेदवारांची पहिली यादी लवकर जाहीर होऊ शकते. या यादीत कोणा-कोणाची नावं असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा करत गंभीर यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे.

गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा 'एक्स' अकाउंटवरून केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं गंभीर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, अशी मागणी गंभीर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा ( Jp Nadda ) यांच्याकडे केली आहे. त्यानंतर मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेन, असं गंभीर यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गौतम गंभीर यांनी 'एक्स'वर लिहिलं, "माननीय पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना माझी विनंती की, त्यांनी मला माझ्या राजकीय कर्तव्यांतून मुक्त करावं. त्यामुळे मला क्रिकेटशी संबंधित कामांकडे लक्ष केंद्रित करता येईल. मला जनसेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे मनपूर्वक आभार, जय हिंद."

पूर्व दिल्ली मतदारसंघातून गौतम गंभीर लोकसभेवर निवडून गेले आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर यांनी मोठा विजय मिळवला होता. गौतम गंभीर यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा 3,91,222 मतांनी पराभव केला होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT