Narendra Modi Speech: मोदींचा काँग्रेससह शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल; तर ठाकरेेंचा साधा उल्लेखही नाही

Pm Narendra Modi target to Sharad Pawar And Congress In Yavatmal : 2014 ला यवतमाळ येथील सभेनंतर एनडीएने 300 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकल्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत यवतमाळच्या सभेनंतर एनडीएने 350 लोकसभेच्या जागा जिंकल्या. आता 2024...
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Yavatmal Sabha : मोदींनी भाजपच्या सुशासन विरोधात काँग्रेसचे भ्रष्ट सरकार असे चित्र यवतमाळ च्या सभेत निर्माण केले. विदर्भाच्या मागासलेपणास काँग्रेस जबाबदार होती. काँग्रेस काळातील कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांचे नाव न घेता शेतकरी पॅकेजवर प्रश्न उपस्थित केला. मोदींच्या गॅरंटीने शेतकऱ्यांच्या बँकेत थेट 21 हजार कोटी पोहचले. काँग्रेस सरकारचे सरकार असते तर काय झाले असते याचे भ्रष्ट चित्र त्यांनी मांडले.

पीएम किसान योजनेत देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एका सेंकदात 21 हजार कोटी रुपये आज जमा झाले. ही मोदींची गॅरंटी आहे. पण, काँग्रेसचे सरकार असते तर 18 हजार कोटी रुपये हे मध्येच लुटले गेले असते. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांना केवळ 3 कोटींची मदत मिळाली असती, असा दाखला देत काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यवतमाळच्या सभेत जोरदार प्रहार केला. इतक्यावर मोदी थांबले नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता थेट त्यांनी केलेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

PM Modi
Maratha Reservation : 'बाळा, नेत्याच्या नादाला लागू नको'; मुलाला भावनिक पत्र लिहित वडिलांनी संपवलं जीवन

यवतमाळ येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर जोरदार टीकेचे आसूड ओढले. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारच्या ढिसाळ आणि वेळकाढू धोरणामुळे विदर्भावर अन्याय झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिढ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. विदर्भात सिंचनाची सोय करण्यात काँग्रेसने केलेली काटकसर त्यांनी उदाहरण देत समोर आणली.

इतक्यावर मोदी थांबले नाही तर त्यांनी काँग्रेसने थांबविलेल्या सिंचन योजनांपैकी अनेक सिंचन योजनांना गती देत विदर्भ व मराठवाड्याचा समतोल विकास मोदी सरकारच्या काळात कसा झाला याचे उदाहरण दिले. कोट्यावधींच्या सिंचन योजना प्रलंबित ठेवत काँग्रेसने विदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांना बरबाद केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत केला.

काँग्रेसने 26 सिंचन योजना लटकवल्या होत्या. त्यापैकी आम्ही 12 पूर्ण केल्याचा दावा मोदींनी केला. इतर सिंचन योजना पूर्णत्वास येत आहे असेही ते म्हणाले. 2014 ला यवतमाळ येथील सभेनंतर एनडीएने 300 पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा जिंकल्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत यवतमाळच्या सभेनंतर एनडीएने 350 लोकसभेच्या जागा जिंकल्या. आता 2024 मध्ये मोदींनी यवतमाळ येथील सभेनंतर 400 पारचा नारा यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींनी आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानत त्यांच्या प्रेरणेतून सरकार चालवत असल्याचे सांगतानाच देशाच्या पुढील पंचवीस वर्षाची पायाभरणी गेल्या दहावर्षात केली असून विकसित भारतासाठी शरीराचा कण-कण आणि जीवनाचा क्षण-क्षण देणार असल्याचे मोदी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने उसाच्या एफआरपीत वाढ केल्याचे स्पष्ट करतानाच भविष्यात सहकारी तत्वाने गावपातळीवर कृषी गोदामांची निर्मिती, व्यवस्थापन आणि लाभ देण्याची घोषणा मोदींनी केली.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने पिण्याचे शुध्द पाणी देखील देशातील जनतेला दिले नाही अशी टिका मोदींनी केली. त्यांनी 2014 पूर्वी शंभरपैकी 15 घरात नळाने पाणी येत होते आता मोदी सरकारच्या दहा वर्षात शंभरपैकी 75 घरात नळाने पाणी पोहचत असल्याचा बदल अधोरेखित केला. मोदी सरकारच्या (Modi Government) काळात बचत गटांमार्फत एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत. पुढील काळात तीन कोटी महिला लखपती होतील असा आशावाद व्यक्त करत मोदींनी महिला सशक्तीकरणावर भर दिला. तर ई रिक्शाबरोबर आता ड्रोन क्षेत्रात महिला कार्यरत असून ड्रोन पायलट महिलांच्या हातात भविष्यात शेतीवरील ड्रोन फवारणीचे साधन असेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

ओबीसी(OBC) परिवारांसाठी 10 लाख घरांची योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मोदी म्हणाले. ज्यांना कोणी विचारले नाही त्यांना मोदींनी विचारले आणि पुजल्याचे सांगत पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठीच्या सिंचन योजना, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी, महिला सशक्तीकरण आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातुन युवकांच्या हाताला रोजगार यावर फोकस करत मोदींनी एकप्रकारे लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडल्याचे दिसून आले.

(Edited By Deepak Kulkarni)

PM Modi
Nashik Defence Cluster : उद्योगमंत्र्यांचं नाशिककडे दुर्लक्ष, मात्र फरांदेंच्या मध्यस्थीनंतर फडणवीसांनी दिलं लक्ष, अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com