Union Minister George Kurian addresses a public event before stepping down from the Modi government following the end of his Rajya Sabha tenure. 
देश

George Kurian : मोदी सरकारमधील मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राष्ट्रपतींकडूनही मंजुरी, कारणही आलं समोर...

Union Minister resigns after BJP denies Rajya Sabha extension : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये पक्षाने कुरियन यांना पुन्हा संधी दिली नसल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Jagdish Patil

George Kurian Resignation : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये पक्षाने कुरियन यांना पुन्हा संधी दिली नसल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तर राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेतून जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जॉर्ज कुरियन हे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयासोबतच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयातही केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

केरळमधील जॉर्ज कुरियन हे मोदी सरकारमधील ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव केंद्रीय मंत्री होते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून रोजी संपला आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आहे.

मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ नुकताच संपला. कुरियन हे मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले होते, तर रवनीत सिंह बिट्टू राजस्थानमधून राज्यसभा सदस्य होते.

भाजपने या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची अतिरिक्त मुदत दिली नाही. त्यानंतर जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, तर रवनीत सिंह बिट्टू अद्याप मंत्रिपदावर कायम आहेत. १९६० साली केरळमधील कोट्टायम येथे जन्मलेल्या जॉर्ज कुरियन हे सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत.

१९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून ते पक्षाशी जोडलेले आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतर मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT