Giorgia Meloni, Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi-Giorgia Meloni : मेलोनी यांच्यासोबतच्या मीम्सवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी; म्हणाले...

PM Modi and Giorgia Meloni Memes Podcast with Nikhil Kamath : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैत्रीची सातत्याने चर्चा होत असते.

Rajanand More

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीची आणि मैत्रीची नेहमीच चर्चा होते. मेलोनी यांनी अनेकदा मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांचे फोटो, त्यावरील मीम्स सोशल मीडियात व्हायरल होत असतात. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच या व्हायरल मीम्सवर भाष्य केले आहे.  

निखील कामत यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास भूमिका मांडली आहे. मेलोनी यांच्यासोबतच्या मीम्सवर बोलताना ‘हे तर सुरूच असते. मी त्यात माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही,’ असे सांगत मोदींनी अधिक बोलणे टाळले.

व्हिसा नाकारल्याची आठवण

पंतप्रधान मोदींनी या पॉडकास्टमध्ये अमेरिकेने व्हिसा नाकारल्याची आठवण काढली. ते म्हणाले, एक काळ होता, तेव्हा अमेरिकेने माझा व्हिसा रद्द केला होता. एक व्यक्ती म्हणून अमेरिकेत जाणे न जाणे, माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. पण एका निवडून आलेल्या सरकारच्या प्रमुखाचा अपमान मला वाटत होता. मनामध्ये ती भावना होती.

काही लोकांनी खोटं सांगितलं आणि जगाने ते मानलं. अशाप्रकारचे निर्णय व्हायला लागले. जग असे चालते का? त्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणालो होतो की, मी असा हिंदूस्तान पाहतो की जग व्हिसासाठी रांगेत उभे असेल. हे 2005 चे वाक्य आहे. आज 2025 आहे. आता भारताची वेळ आहे, हे मला दिसत आहे, असे मोदींनी सांगितले.

जगभरात भारताची प्रतिष्ठा कशी वाढली, यावर बोलताना मोदी म्हणाले, विदेशात राहणारे भारतीय लोक आपल्यासाठी राष्ट्रदूत आहेत. आमचा राजदूत तिथे नंतर जातो. आम्ही लोकांना सोबत घेतले. त्यामुळे आपली ताकद काही पटींनी वाढली. जगभरातील भारतीयांना सोबत घेणे, हाही नीती आयोगाच्या उद्देशांपैकी एक उद्देश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT