Fuel Crisis News : इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका जगाला बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या संसदेने तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या निर्णयाने जगातील निम्म्या देशांना होणाऱ्या तेलपुरवठ्यावर थेट परिणाम होणार आहे.
संसदेने होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयावर शिक्कामोर्तब इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी हे करणार आहेत. जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर तेलाच्या भावामध्ये मोठी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमती सध्या प्रति बॅरले 75 डाॅलर आहे ते जवळपास दुप्पट होतील. अंदाजे प्रति बॅरलचे दर थेट 130 डाॅलर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर इराणकडून सांगण्यात आले की त्यांच्या अणुस्थळे नष्ट झाली असलीतरी खेळ संपलेला नाही. अमेरिकन लोकांना या हल्ल्याचे लवकरच उत्तर मिळेल. इराणाचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय करारचे उल्लंघन केले आहे. त्या विरोधात आपण संयुक्त राष्ट्रसंघात जाणार आहोत.
जगावर इंधन दरवाढीचे संकट असताना भारताला मात्र इंधन टंचाईचे चिंता नाही. देशाला अनेक आठवडे पुरेल इतका इंधनसाठा आपल्याकडे असल्याचे पेट्रोलियन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितली आहे. भारत दररोज 5.5 दशलक्ष बॅरल तेल वापरतो. त्यातील 1.5 दशलक्ष बॅरल तेल होर्मुझ जलमार्गातून येते.
इराणवरील अमेरिकेने केलेला हल्ला हा बेजबादार असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्याचे तीव्र शब्दांत रशियाने निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे सनद आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे घोउल्लंघन असल्याचे रशियाने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.