US Vs Iran : ट्रम्प यांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली; इराण चवताळून उठला, अमेरिकेला परिणाम भोगावे लागणार...

Iran Issues Open Threat to the United States : इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इस्फहान, फोर्दो आणि नतांज या तीन प्लॅंटवर हल्ला झाल्यानंतर अरागची यांनी सोशल मीडियातून ट्रम्प यांनी धमकी दिली.
U.S. airbases placed on high alert after Iran issues open threat following attacks on key regional sites.
U.S. airbases placed on high alert after Iran issues open threat following attacks on key regional sites. Sarkarnama
Published on
Updated on

U.S. Military Bases Placed on High Alert : इराण आणि इस्त्राईलमधील युध्दात अमेरिकेनेही आज उडी घेतली. अमेरिकेने इराणीमधील तीन न्युक्लिअर प्लॅंटवर जोरदार हल्ला चढवत ते नेस्तनाबूत केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला माघार घेण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. पण दोन दिवसांत ट्रम्प यांचा निर्णय बदलला अन् हल्ला चढवला. पण या हल्ल्यामुळे इराण आता चवताळून उठला असून ट्रम्प यांना खुली धमकी दिली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेच्या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इस्फहान, फोर्दो आणि नतांज या तीन प्लॅंटवर हल्ला झाल्यानंतर अरागची यांनी सोशल मीडियातून ट्रम्प यांनी धमकी दिली. ते म्हणाले, आज सकाळच्या घटना खूपच भयानक आहेत आणि त्याचे दुरगामी परिणाम होतील.

संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यानुसार इराणजवळ आता प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व पर्याय खुले आहे. आपली संप्रभुता, हितांचे आणि लोकांच्या रक्षणासाठी सर्व पर्याय उपलब्ध असल्याचे सांगत अरागची यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून वॉशिंग्टन, न्यूयॉर्क या प्रमुख शहरांमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सर्व एअर बेसवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

U.S. airbases placed on high alert after Iran issues open threat following attacks on key regional sites.
America Attacks Iran : अमेरिकेचा इराणवर हल्ला, इस्रायलचा आनंद गगनात मावेना ; नेतन्याहू म्हणाले 'थैंक्यू ट्रम्प'

इराणमधील आण्विक ऊर्जा संघटनेने आण्विक ठिकाणांवर हल्ल्याची निंदा केली आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे संघटनेने म्हटले आहे. इराणी सरकारी टीव्हीवरून अमेरिकेला धमकी देण्यात आली आहे. आता प्रत्येक अमेरिकी नागरिक आणि सैन्याचे जवान आमचे लक्ष्य असेल, असे ‘आयआरएनए’वर निवेदकांनी म्हटले.

इराण इंटरनॅशनलनुसार, एका अन्य सरकारी टीव्ही कार्यक्रमात निवदेकाने म्हटले की, ट्रम्प, लढाई तर आता सुरू झाली आहे. आता तुम्ही शांततेच्या गोष्टी करता? तुम्हाला निष्काळजीपणाचे परिणाम समजतील, अशापध्दतीने आम्ही तुमच्यासोबत लढू, असा इशारा देण्यात आला आहे.

U.S. airbases placed on high alert after Iran issues open threat following attacks on key regional sites.
USA Attack Iran : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री, तीन अणुस्थळांवर भीषण हल्ला

न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितले की, शहरातील धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय ठिकाणांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात केली जात आहे. इराणमधील स्थितीवर आम्ही नजर ठेऊन आहोत. लॉस एंजिल्सच्या महापौर करेन बास यांनी म्हटले आहे की, इराणवरील हल्ल्यानंतर आम्ही सार्वजनिक सुरक्षेला असलेल्या धोक्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. सध्यातरीही कोणताही धोका दिसत नाही. पण सावधगिरी म्हणून प्रमुख ठिकाणी गस्त वाढविण्यात आल्याचेही बास यांनी सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com