पणजी : शिवसेना गोवा विधानसभेसाठी दहा ते बारा जागा लढविणार आहे, आज नऊ उमेदवारांची नावे शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी जाहीर केली. ''येत्या दोन-तीन दिवसात शिवसेना दुसरी यादी जाहीर करण्यात येईल,'' असे राऊत म्हणाले. संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shivsena Candidates List For Goa Assembly Elections)
संजय राऊत म्हणाले, ''गोव्यात प्रतिष्ठांऐवजी सामान्य कार्यक्रर्त्यांना शिवसेना तिकीट देणार आहे. गोव्याच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते, मंत्री येणार असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे येणार आहेत. गोव्याच्या विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार असतील. स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याचा आमचा अजेंडा आहे,'' (Aditya Thackeray News Updates)
गोव्यात भाजपच्या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय भाजपनं दिला आहे. पण उत्पल पर्रिकर यांनी पणजीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, ''पर्रिकरांना तिकीट नाकारणे हा भाजपचा प्रश्न आहे. मनोहर पर्रिकरांबाबत गोवेकरांच्या भावना वेगळ्या आहे. उत्पल पर्रिकर हे पणजीतून स्वतंत्र लढणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अन्य पक्षाची मने वळवू. पर्रिकरांसाठी आम्ही पणजीतून आमच्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेऊ,''
''गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय. गोव्यातील निवडणुका आम्ही 2017 मध्येही लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण, गोव्याच्या निवडणुका, एकंदरीत राजकारण हे काही आशादायी दिसत नाही, सर्वांसाठीच. गोव्याच्या जनतेसाठी. वातावरण पूर्ण गढूळ झालंय. अनेक राजकीय पक्ष नव्यानं उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढत आहेत, हेदेखील स्पष्ट होत नाही." असे राऊतांनी सांगितलं.
''भाजपने जर घराणेशाहीचा मुद्यांवर उत्पल पर्रिकरांची उमेदवारी नाकारली आहे, पण भाजपने उत्तरप्रदेशात तिकीट देताना घराणेशाहीचा विचार केलेला दिसतो. त्यामुळे घराणेशाहीवरुन उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारणे चुकीचे आहे,'' असे पर्रिकर म्हणाले. ''उत्तरप्रदेशातील भाजपच्या उमेदवारांची यादी काढली तर आपल्याला सगळीकडे घराणेशाहीच दिसेल,'' असे राऊत यांनी सांगितले.
कॉग्रेस गोव्यात स्वबळावर लढणार आहे. यावर संजय राऊत म्हणाले, ''महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेने -कॉग्रेसची आघाडी आहे. त्याप्रमाणे गोव्याच्या निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने कॉग्रेसला दिला होता. स्वबळावर लढणाऱ्या कॉग्रेस गोव्याची जनता स्वीकारणं कठिण आहे. कॉग्रेसने याबाबत आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे,'' असा सल्ला राऊतांची कॉग्रेसला यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.