सपा-रालोदमध्ये मथुरेच्या सीटवरुन वाद ; दोघांचे उमेदवार रिंगणात

सध्या सपा आणि आरएलडीच्या यांच्यात वेगवेगळ्या उमेदवारांच्या तिकीट देण्यावरुन वाद सुरु झाला आहे.
Yogesh Nowhwar, Akhilesh Yadav
Yogesh Nowhwar, Akhilesh Yadavsarkarnama
Published on
Updated on

लखनैा : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करीत आहेत. मथुरा विधानसभासाठी पक्षानी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मथुराच्या पाच जागापैकी तीन जागांवर आरएलडीने (SP-RLD Alliance)आपल्या उमेदवाराबाबत स्पष्टपणे नावे जाहीर केल्यानंतर समाजवादी पक्षानेही (Samajwadi Party) येथे दोन जागेवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

माट विधानसभेच्या जागेबाबत सध्या सपा आणि आरएलडीच्या यांच्यात वेगवेगळ्या उमेदवारांच्या तिकीट देण्यावरुन वाद सुरु झाला आहे. पण ही जागा सपाच्या वाट्याला आहे. या जागेवर दोन उमेदवारांची नावे जाहीर झाल्याने येथे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Yogesh Nowhwar, Akhilesh Yadav
मुख्यमंत्र्यांची खूर्ची अन् अंधविश्वास ; योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणार?

मुथुरातील माट विधानसभेसाठी सपाचे हिमायत याफ्ता यांचे नाव जाहीर झाले आहे. तर शुक्रवारी रालोदने या जागेवर योगेश नौहवार यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसापूर्वी माट विधानसभेसाठी संजय लाठर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता रालोदने योगेश नौहवार यांची उमेदवारी मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही पक्षानी जाहीर केलेल्या उमेदवारीवरुन त्यांच्यात वाद सुरु आहे. आरएलडीचे उमेदवार योगेश नौहवार यांनी आपला अर्ज देखील दाखल केला आहे. पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतरही ते अर्ज मागे घेण्यास तयारी नाही. या जागेसाठी जयंत चैाधरी स्वतः निवडणुक लढणार असतील, तर मी ही जागा त्यांच्यासाठी सोडून देईल, असे योगेश नौहवार यांनी सांगितले.

Yogesh Nowhwar, Akhilesh Yadav
आव्हाडांच्या तक्रारीनंतर कालीचरण बाबाला आज ठाण्याच्या न्यायालयात हजर करणार

योगेश नौहवार यांची या मतदारसंघात चांगली पकड आहे. ते येथून तीन वेळा निवडणूक आले आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यमान आमदारांना ते चांगली लढत देऊ शकतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा ४३२ मतांनी पराभव झाला होता. सपाचे उमेदवार संजय सिंह लाठर हे अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com