BJP
BJP Sarkarnama
देश

उत्पल पर्रीकर नव्हे तर मंत्र्यांच्या बायकांमुळं गोव्यातील भाजपची यादी रखडली!

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यातील (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत काँग्रेने (Congress) बाजी मारली आहे. भाजपचा (BJP) पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त अद्याप निघत नसताना काँग्रेसने आज पाचवी यादी जाहीर करुन बाजी मारली आहे. याचवेळी भाजपमधील यादीचा तिढा अद्याप सुटत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी पणजीतून तिकिट मागिकल्याने भाजपच्या यादीला विलंब होत आहे, अशी चर्चा सुरू होती. आता पक्षाच्या गोटातून वेगळीच माहिती समोर येऊ लागली आहे. भाजपचे अनेक बडे मंत्री त्यांच्या पत्नीसाठी तिकिट मागत आहेत. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एक कुटुंब, एक उमेदवार, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. यामुळे उमेदवार यादीचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री चंद्रकांत 'बाबू' कवळेकर यांनी सेंगुएम मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. याचबरोबर त्यांनी पत्नी सावित्री यांना तिकिट मिळावे, यासाठी आग्रह धरला आहे. कवळेकरांनी पत्नीसाठी क्युपेममधून उमेदवारी मागितली आहे. कवळेकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. ते विरोधी पक्षनेते होते. नंतर त्यांनी भाजपपमध्ये प्रवेश केला होता. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही पत्नीसाठी तिकिट मागितले आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांमध्ये राणे पहिले होते. त्यावेळी काही दिवसांतच ते भाजपमध्ये दाखल झाले होते. राणे हे त्यांचे पिता प्रतापसिंह राणेंच्या विरोधात लढत आहेत. राणेंना पत्नीसाठी वाळपाईमधून तिकिट मागितले आहे.

पणजीतील विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर महसूलमंत्री आहेत. त्यांनी स्वत:साठी पणजी आणि पत्नीसाठी ताळगावमधून उमेदवारी मागितली आहे. बाबूश यांच्या पणजी मतदारसंघातूनच उत्पल पर्रीकर हे इच्छुक आहेत. त्यांनी दोन महिन्यांपासून पणजीत प्रचारही सुरू केला आहे. याचबरोबर पक्षाला त्यांनी जाहीर इशाराही दिला आहे. त्यामुळे हासुद्धा तिढा भाजपसमोर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT