Babush Monserrate, Manohar Parrikar Sarkarnama
देश

Manohar Parrikar : पर्रीकरांवर भाजपच्या मंत्र्यांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप; पक्षात पडले दोन गट?

Rajanand More

Goa News : गोवा भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पण या आरोपांना मुख्यमंत्र्यांसह भाजपमधील नेत्यांनी थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. तर काँग्रेसकडून भाजपमध्ये दोन गट पडले असून अंतर्गत घमासान सुरू असल्याचा दावा केला आहे.

गोव्याचे (Goa) महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पर्रीकरांनी नेमलेल्या सल्लागारांनी स्मार्ट सिटीच्या कामात कोट्यवधी रुपये खाल्ले. त्यांच्यावर झालेल्या खर्चात दोन पूल बांधून झाले असते. त्यांच्या काळात खूप भ्रष्टाचार झाला. जवळच्या मित्रांना बेकायदेशीरपणे कंत्राटं देण्यात आल्याचे आरोप मोन्सेरात यांनी बुधवारी केले आहेत.

मोन्सेरात यांनी पहिल्यांदाच मनोहर पर्रीकर यांच्यावर हल्लाबोल केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये दोन गट पडले असून त्यांच्यातच वाद सुरू झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर बाबूश यांनी भाजपने पणजीतून तिकीट दिले होते. पर्रीकर यांचा पुत्र उत्पल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर बाबूश यांनी मनोहर पर्रीकरांचा वारसा आता संपला, आता पक्ष प्रथम, असे म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाबूश यांच्या टीकेमुळे काँग्रेसच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पर्रीकर म्हणाले, भाजपमध्येच आता वाद सुरू झाला आहे. पक्षामध्ये मोठी फूट पडल्याचा दावाही अमित पर्रीकरांनी केला आहे. भाजपने मात्र या वादापासून दूर राहणेच पसंत केले आहे. मुख्यमंत्र्यांवर यावर थेटपणे भाष्य केलेले नाही.

भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै यांनी ही टीका योग्य नसल्याचे म्हणत अधिक बोलणे टाळले. ते म्हणाले, गोवा आणि देशासाठी मनोहर पर्रीकरांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या कामामुळेच त्यांना पद्मविभूषण सन्मान मिळाला. देशहितासाठी त्यांनी केलेल्या कामाचा आपण नेहमीच सन्मान करायला हवा, असे पै यांनी सांगितले. पण त्यांनी थेट बाबूश यांच्यावर भाष्य केले नाही.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT