MP Sujay Vikhe: निमंत्रणच नाही, तरीही ते म्हणतात, अयोध्येला जाणार नाही; विखेंचा काँग्रेसला टोला

Ramlala Consecration Ceremony Invitation:नाही आले तरी हरकत नाही.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSarkarnama
Published on
Updated on

Nagar: अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले आहे. काँग्रेसच्या या कृतीवर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी तिखट शब्दांचा मारा केला आहे. 'ते लोक म्हणत आहे, त्यांना निमंत्रणच आलंच नाही. ही वास्तविकता आहे. ज्यांना निमंत्रण आलेच नाही, तेच म्हणत आहेत मी जाणार नाही, मी जाणार नाही', अशा शब्दात खासदार विखेंनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामाची मूर्तीची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी भाजपकडून देशभर विविध धार्मिक उपक्रम हाती घेतले जात आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे देशभरातील प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाला देखील निमंत्रण देण्यात आले आहे. पंरतु काँग्रेसने निमंत्रण देऊन देखील कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावर भाजपकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील काँग्रेसवर तिखट शब्दात टीका केली आहे. नगर शहरात साखर आणि डाळ वाटपाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

खासदार विखे म्हणाले, 'ते लोक म्हणत आहे, त्यांना निमंत्रणच आलंच नाही. ही वास्तविकता आहे. ज्यांना निमंत्रण आलेच नाही, तेच म्हणत आहेत मी जाणार नाही, मी जाणार नाही. काही लोकांनी डुबलिकेट निमंत्रण पत्रिका देखील छापून घेतली आहे. मला निमंत्रण आलाय, मला निमंत्रण आलाय. पण मी जाणार नाही. यांना कोणालाच बोलवलेले नाही. हे फक्त स्वतःहून सांगत आहेत की, मी जाणार नाही. नाही आले तरी हरकत नाही".

मेळाव्याच्या निमंत्रणावर विखे म्हणाले..

महायुतीचा मेळावा १४ जानेवारीला होत आहे. या मेळाव्याला महायुती असलेल्या सर्व पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या मेळाव्याला सर्व आमदार येतील का, या प्रश्नावर खासदार सुजय विखे यांनी कोणाचेही नाव न घेता बोचणारी प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार विखे म्हणाले, निमंत्रण देण्याचे काम आहे. लग्नतिथ आहे. कोणाला बाहेर जावे लागले. कोणाला जुलाब झाले. कोणाचा घसा दुखावला लागला. आपण काय करू शकतो. पण गोळ्या देऊ शकतो. एखादा बेडवरूनच उठत नसेल, आजारी पडला असेल, त्याला काय बळजबरी आणू शकत नाही. महायुती सक्षम आहे. जसे अयोध्येचे जसे निमंत्रण दिले आहेत, तसे मेळाव्याचे देखील निमंत्रण गेले आहेत," असे खासदार विखे यांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

Ayodhya Ram Mandir
Maharashtra Politics: रेडा दूध देत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य, मात्र काहींना ते कळलेच नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com