Goa Political News : गोवा केंद्रशासित प्रदेश व्हावा किंवा त्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे यासाठी 16 जानेवारी 1967 रोजी देशातील एकमेव जनमत कौल पार पडला. हा दिवस आता 'अस्मिताय दिस' म्हणून नियमित साजरा केला जाणार आहे.
याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pramod Sawant यांनी घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबत मांडलेल्या खासगी सदस्य ठरावाला मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.
युरी आलेमाव यांनी, गोवा महाराष्ट्रात Maharashtra विलीन झाला असता तर तो आज एक महाराष्ट्राचा जिल्हा असता. जॅक सक्वेरा यांनी या प्रकरणी उठाव केला. तसेच, अनेक नेत्यांनी या प्रकरणी योगदान देत गोव्याची अस्मिता जिवंत ठेवली. त्यामुळे या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन राज्य पातळीवर 16 जानेवारी हा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करावा असा आग्रह धरला होता.
यावर मत मांडताना आमदार विजय सरदेसाईंनी सत्ताधारी पक्षाला मनोहर पर्रीकर आणि मायकल लोबो यांच्या भाषणाचा काही भाग वाचून दाखवला. तसेच, गोवा आज राज्य नसते तर गोव्याचे नाव देखील गोवा नसते. गोव्याचे नाव गोवापूरी किंवा गोमन्तकवाडी असे असते.
रोहन खंवटे गोवा प्रमोट करण्यासाठी कधीच स्पेनला जाऊ शकले नसते. शिवाय ते कधीच मंत्रीही झाले नसते. त्याऐवजी ते एखाद्या पंचायतीचे सरपंच असते, असे सरदेसाई म्हणाले.
युरी आलेमाव यांच्या ठरावावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी पर्रीकर मुख्यमंत्री असताना राज्य हा दिवस साजरा करत होते. पण, त्यानंतर काही कारणास्तव तो साजरा झाला नाही. यापुढे मात्र तो नियमित साजरा केला जाईल, अशी घोषणा केली. आलेमाव यांनी ठराव मागे घेण्याची विनंती केली. सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आलेमाव यांनी ठराव मागे घेतला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.