Eknath Shinde : नकली वाघांना असली वाघनखांचं महत्त्व काय समजणार; मुख्यमंत्री शिंदेंचा रोख कुणाकडे ?

Wagh Nakha in Satara : आपल्या सगळ्यांना त्या काळच्या इतिहासाची साक्ष देणारी वाघनखे पहाण्याचे भाग्य लाभले आहे. ही वाघनखे सात महिने साताऱ्यात राहणार ठेवण्यात येणार आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली वाघांना महाराजांच्या वाघनखांचे महत्व काय समजणार, अशी टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळून लगावला. तर त्यांची नियतही ही नकली आणि बुद्धीही नकली असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ब्रिटनच्या संग्रहालयातून आणण्यात आलेली वाघनखांचे लोकर्पण व शस्त्र प्रदर्शनाचे उद॒घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis, अजित पवार व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

एकनाथ शिंदे Eknath Shinde म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आराध्य दैवत आहेत. त्याकाळी अफझल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर त्याचा वाघनखांच्या माध्यमातून वध केला होता. त्या शौर्याचे प्रतिक असलेली वाघनखे सर्व प्रथम मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात आणण्यात आली आहे. या शौर्याच्या प्रतिकाचा आम्हाला अभिमान आहे.

आपल्या सगळ्यांना त्या काळच्या इतिहासाची साक्ष देणारी वाघनखे पहाण्याचे भाग्य लाभले आहे. ही वाघनखे सात महिने साताऱ्यात राहणार ठेवण्यात येणार असून या वाघनखांचे दर्शन सर्वांनी घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
K P Patil Vs Prakash Abitkar : 'टाक कमिशन, घे परमिशन'! के. पी. पाटलांची आबिटकरांवर बोचरी टीका

वाघनखे नकली म्हणणाऱ्यांनाही श्री. शिंदे यांनी यावेळी टोला लगावला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे महत्व काय समजणार, अशी टीका त्यांनी केली. तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियतही नकली आणि त्यांची बुद्धीही नकली असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde : 'सुधीरभाऊ, तुम्ही वेळेवर ही वाघनखं आणली'; CM शिंदेंना विधानसभेपूर्वी म्हणायचं होतं का...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com