Goa Congress latest news sarkarnama
देश

Goa Congress : सात महिन्यात 'या' चुकामुळे काँग्रेस फुटली..

Goa Congress : गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी बुधवारी राजीनामा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र कोसळल्यानंतर आता गोव्यात काँग्रेसला (goa congress) मोठे खिंडार पडले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार आहेत. (Goa Congress latest news)

विरोधी पक्षनेते मायकल लोबो (michael lobo) यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

"लवकरच काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे," असा गोप्यस्फोट गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी बुधवारी राजीनामा दिला आहे.

गोव्यात कॉंग्रेसला गळती का लागली, सात महिन्यात काँग्रेस कशी फुटली याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. गेल्या निवडणुकीत निकाल लागल्यानंतर कॉंग्रेसने तीन मोठ्या चुका केल्या, त्यामुळे कॉंग्रेस पक्ष सात महिन्यात फुटला, असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे.

पाच महिन्यापूर्वी गोव्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी ११ जागा मिळाल्या होत्या. पण या अकरापैकी ८ आमदारांनी आता राजीनामा देऊन ते भाजपच्या वाटेवर आहेत.

सात महिन्यात काँग्रेस कशी फुटली हे जाणून घेऊया..

  1. गोव्यातील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा राजीनामा घेतला, पण प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीपूर्वीच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते गुंडूराव यांच्यावर नाराज होते.

  2. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु झाली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचा परिणाम झाला. त्यावेळी पक्षाच्या सुमारे चार आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. यावरही काँग्रेसने डॅमेज कंट्रोलच्या उपाययोजना केल्या नाहीत. नव्या अध्यक्षांवरून वाद निर्माण झाला पण पक्षाने कारवाई केली नाही.

  3. मायकल लोबो यांनी निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने बाहेरून आलेल्या मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते केले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाला विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असलेले दिगंबर कामत यांनी विरोध केला होता. तेव्हापासून काँग्रेसमध्ये फूट पडेल, असे राजकीय पंडित सांगत होते, ते आता खरं ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT