Devendra Fadnavis News sarkarnama
देश

#अकेला देवेंद्र क्या करेगा? ; फडणवीसांनी करुन दाखवलं!

'एक फडणवीस सर्व कासावीस' अशी अवस्था सध्या विरोधकांची झाली आहे का, असा प्रश्न देखील सध्या विचारण्यात येतो.

Mangesh Mahale

पुणे : महाविकास आघाडी सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 'अकेला देवेंद्र क्या करेगा' असे म्हणत डिवचलं. पण फडणवीसांना करुन दाखवलं. अशी चर्चा सध्या गोव्याच्या निवडणूक निकालावरुन सुरु झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या फडणवीसांनी गोवा काबीज केले. ''अकेला देवेंद्र क्या करेगा,'' असे म्हणणाऱ्यांना फडणवीसांनी चांगलीच चपराक लगावली आहे. #अकेला देवेंद्र क्या करेगा, हा ट्रेंड सध्या जोरात सुरु आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Devendra Fadnavis News updates)

राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना फडणवीसांनी टप्यात आणून कार्यक्रम केला असेही काही जण म्हणतात, तर संपूर्ण महाविकास आघाडीला फडणवीस पुरुन उरले. १०६ आमदार घरी बसवले, ''अकेला देवेंद्र क्या करेगा'' अशी टीका करीत फडणवीसांना डिवचण्यात आले. पण याच फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या एक-एका मंत्र्यांनी विकेट काढली, महाविकास आघाडीच्या बारा मंत्र्यांची सध्या चैाकशी सुरु आहे. फडणवीस टप्यात आल्यावर कार्यक्रम करीत नाही, तर टप्यात आणण्याची परिस्थिती निर्माण करतात, मग करेट कार्यक्रम करतात, असे म्हटलं जाते.

दोन दिवसापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी आघाडी सरकारवर 'पेन ड्राईव्ह' बॅाम्ब टाकला. फडणवीस (Devendra Fadnavis) थेट विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan)यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

''अकेला देवेंद्र क्या करेगा" याचं उत्तर आज अवघ्या महाराष्ट्रासोबत देशाला मिळालं ! गंभीर विषयाला कसं हाताळायचं त्याचे पुरावे कसे सादर करायचे? व्यवस्थित विषयाची मांडणी कशी करायची, आणि हे सर्व करत असताना विरोधकांची बोलतीही बंद करायची याची कला फडणवीस खूप चांगल्या रीतीने येते.

त्यामुळे त्याचाशी मुकाबला करण्यासाठी विरोधकांना पूर्ण तयारी करुन आखाड्यात उतरावे लागते. सत्तेत नसताही फडणवीसांची धास्ती महाविकास आघाडीला नसते. दिवाळीच 'बॅाम्ब फोडणार' असे सांगत फडणवीसांनी मलिकांना ईडीच्या कोठडीत पाठविले. 'एक फडणवीस सर्व कासावीस' अशी अवस्था सध्या विरोधकांची झाली आहे का, असा प्रश्न देखील सध्या विचारण्यात येतो.

गोव्यात भाजपाला मिळालेल्या यशात देवेंद्र फडणवीस यांच योगदान महत्त्वाच आहे. अनेक ठिकाणी पक्षाचा निवडणूक प्रभारी असतो त्याच्या बद्दल तक्रारी होतात. तो केवळ नावापुरताच काम करतो मात्र फडणवीस यांनी या निवडणुकीत आपलं संघटनकौशल्य दाखवलं हे निश्चित.

केवळ दोनच खासदार असल्याने गोव्याला देशाचा राजकारणात आतापर्यंत विशेष महत्त्व नव्हतं, मात्र 2022 ची गोव्याची निवडणूक देशभर चर्चेची ठरली. 2017 ला केवळ 13 जागा असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करून भाजपाला अनपेक्षित सत्ता मिळवून दिली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सत्तेच्या विरोधात जनमत आहे अशी चर्चा होती.

गोवा भाजपाचा चेहरा असणाऱ्या मनोहर पर्रीकरांच निधन झालं.अशा अडचणीत असलेल्या राज्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली गेली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रभारी म्हणजे फक्त नावालाच असतो ही संकल्पना पुसून काढली. त्यानी प्रत्येक मतदारसंघात लक्ष घातले. अनेक उमेदवार बदलले.

पर्रीकरांना उमेदवारी नाकारण्याचे धाडस

मनोहर पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्याच धाडस केलं. खूप टीका सहन करावी लागली तरीही देवेंद्र फडणवीस ठाम राहिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची फौज गोव्यात पंधरा दिवस ठेवली. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत इथं थांबून काम केलं. त्याचाच परिणाम म्हणजे गोव्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. प्रमोद सावंत पाचशे मतांनी विजयी झाले आहेत. बिहारचे प्रभारी म्हणून फडणवीसांची उत्तम कामगिरी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT