पणजी : गोव्यात भाजप १८ जागा, तर कॉग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहेत. मगोप ५, आप एका जागेवर आघाडी आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला आहे. गोवा निवडणूक प्रभारी पी चिदंबरम (p chidambaram)आणि डीके शिवकुमारसह वरिष्ठ नेत्यांनी गोव्यात ठाण मांडलं आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना रिसॉर्टमधून हॅाटेलमध्ये हलविण्यात आले आहे. (goa election result news)
गोव्यातील पणजी जवळ असलेल्या बम्बोलिम हॉटेलमध्ये काँग्रेसनं सगळ्या उमेदवारांना ठेवलं होते. मात्र बुधवारी त्यांना मडगांव शहरातील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले. या रिसॉर्टचे मालक काँग्रेसचा एक उमेदवार आहे. त्यांना आता हॅाटेलमध्ये हलविण्यात आले आहे.
कॉग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम निकालाच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. निकाल हाती आल्यानंतर आघाडीमधील नेत्याने नाव आणि राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या समोर सरकार बनवण्याचा दावा करण्याबाबत निर्णय झाला आहे.
निकालापूर्वी कॅाग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांची वेळ घेतली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेस यांचे उमेदवार जास्त निवडून येतील आणि अपक्ष किंवा इतर पक्षांच्या मदतीनं सत्ता काबीज करता येईल, असा अंदाज आहे. गोव्यात सत्ता कुणाला मिळणार हे सांगता येणार नाही. कारण गोवेकर कोणता विचार करून मतदान करेल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे.
काँग्रेसचे पारडं जड असल्याचे काही पोल्समध्ये दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस सोबत युती करण्यास तयार आहे.
निवडणुकीच्या निकालापूर्वी प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची ही बैठक जवळपास 30 मिनिटे चालली. सावंत यांनी एक्झिट पोलनंतरच्या राजकीय परिस्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली, असे सांगण्यात येत आहे.
गोव्यात ४० विधानसभा मतदारसंघ आहेत. यापूर्वी २०१७च्या गोवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला थेट बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेसला एकूण १७ जागा मिळाल्या होत्या. पण प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांच्या साथीने भाजपचा सत्तेचा दावा केला. केंद्रातून परत येत मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्यातले चित्र बदलले. प्रमोद सावंत पर्रीकरांनंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.