Devendra Fadnavis | Devendra Fadnavis News | Goa election results 2022 news
Devendra Fadnavis | Devendra Fadnavis News | Goa election results 2022 news sarkarnama
देश

Goa election : फडणवीसांचे परफेक्ट नियोजन, कॉग्रेसचा 'करेक्ट' कार्यक्रम

संभाजी थोरात

पणजी : गोव्याची ओळख महाराष्ट्राशेजारी असलेलं छोटं राज्य म्हणूनआहे. या राज्याच्या राजकारणावर (Goa election)नेहमीच महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रभाव जाणवतो. याही वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या परफेक्ट नियोजनाने गोव्यात करेक्ट कार्यक्रम झाला आहे. (Devendra Fadnavis News updtaes)

गोव्यात भाजपाला मिळालेल्या यशात देवेंद्र फडणवीस यांच योगदान महत्त्वाच आहे. अनेक ठिकाणी पक्षाचा निवडणूक प्रभारी असतो त्याच्या बद्दल तक्रारी होतात. तो केवळ नावापुरताच काम करतो मात्र फडणवीस यांनी या निवडणुकीत आपलं संघटनकौशल्य दाखवलं हे निश्चित. फडणवीस हे बिहार निवडणुकीतही प्रभारी होते. (Goa election results 2022 news updates)

केवळ दोनच खासदार असल्याने गोव्याला देशाचा राजकारणात आतापर्यंत विशेष महत्त्व नव्हतं, मात्र 2022 ची गोव्याची निवडणूक देशभर चर्चेची ठरली. 2017 ला केवळ 13 जागा असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करून भाजपाला अनपेक्षित सत्ता मिळवून दिली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सत्तेच्या विरोधात जनमत आहे अशी चर्चा होती.

मायनिंगच धोरण बदलल्याने मायनिंग माफिया भाजपाच्या विरोधात होते तर परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येला गोव्यातून विरोध होत होता. त्याचबरोबर जमिनींच्या मालकी चा प्रश्न ही अनेक ठिकाणी होता.याबरोबरच सत्तेच्या विरोधात वातावरण होते. त्यातच गोवा भाजपाचा चेहरा असणाऱ्या मनोहर पर्रीकरांच निधन झालं.अशा अडचणीत असलेल्या राज्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या कडे दिली गेली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रभारी म्हणजे फक्त नावालाच असतो ही संकल्पना पुसून काढली. त्यानी प्रत्येक मतदारसंघात लक्ष घातले. अनेक उमेदवार बदलले.

मनोहर पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्याच धाडस केलं. खूप टीका सहन करावी लागली तरीही देवेंद्र फडणवीस ठाम राहिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्टारातून आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची फौज गोव्यात पंधरा दिवस ठेवली. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत इथं थांबून काम केलं.त्याचाच परिणाम म्हणजे गोव्यात भाजपाला घवघवीत यश मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT