पणजी : भाजपने (BJP) पुन्हा एकदा गोव्यात सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याच गळ्यात पुन्हा पडली आहे. भाजपने सत्ता मिळवल्यानंतर महिनाभरातच आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणारा काँग्रेस (Congress) नेता अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना काल पोलिसांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. सगलानी या मुख्यमंत्री सावंत यांच्या विरोधात साखळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात सगलानी यांनी जोरदार टक्कर दिली होती. यामुळे केवळ 666 मतांनी सावंतांचा विजय झाला होता. यामुळे सावंतांच्या विरोधात त्यांच्या विरोधकांनी मोहीम उघडली होती. ते अतिशय कमी मतांनी निवडून आल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करू नये, अशी भूमिका पक्षातील नेत्यांनी घेतली होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा सावंतांना पसंती दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगलानी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांनी एका व्यावसायिकाला धमकावून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सगलानी यांच्यावर अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे सगलानी यांना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाल्यानंतर सहा दिवसांत 24 जानेवारीला सगलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सगलानी यांच्या विरोधात जानेवारी महिन्यातच आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सावंत यांचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत झाला आहे. त्यावेळी सावंत यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. सुरवातीला सावंत यांच्यासह विश्वजीत राणे (Vishwajit Rane), मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांचा समावेश होता. मंत्रिमंडळात तीन जागा रिकाम्या असल्याने नंतर विस्तार करण्यात आला. यात फळदेसाई, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर आणि भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना स्थान मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.