Jaspal Singh Sarkarnama
देश

Goa DGP Jaspal Singh : गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली अटळ; केंद्राकडे पाठवला अहवाल!

Goa DGP Jaspal Singh and Goa Goverment : हालचालींना वेग, परदेशात असणाऱ्या IGP बिष्णोई यांना तातडीचे बोलावणे

सरकारनामा ब्यूरो

Jaspal Singh transferred News : आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला असून, याबाबतचा अहवाल केंद्राला पाठविण्यात आला आहे.

महासंचालक पदाचा अतिरिक्त भार राज्याचे तुरुंग पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणी कारवाईसाठी पोलीस महासंचालक जसपाल सिंग(Jaspal Singh) यांचा दबाव होता. अशा प्रकारचा अहवाल हणजूण पोलिसांकडून राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्यात आला. या अहवालात सिंग यांच्याविरोधात इतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेत.

यामुळे जसपाल सिंग यांच्या निलंबनाची मागणी होत असताना राज्य सरकारकडून विद्यमान महासंचालक सिंग यांच्या बदलीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. बदलीसाठीचा अहलवाल देखील केंद्राकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच, या पदाची अतिरिक्त जबाबदारी राज्याचे तुरुंग पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. परदेशात रजेवर असणाऱ्या ओमवीर यांना तत्काळ हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आसगाव प्रकरणाने राज्यात राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले. विरोधी पक्षातील नेत्यांनी जसपाल यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत त्यांच्या निलंबनासह सहआरोपी करण्याची मागणी केली. तर, याबाबत स्पष्टीकरण देताना जसपाल यांनी त्यांच्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला.

तसेच, कोणताही पोलिस दुसऱ्या पोलिसाला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय संशयित पूजा शर्माशी त्यांचा काहीही संबध नसल्याचे ते म्हणाले. पण आसगाव प्रकरणाबाबत राज्यातील सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त झाल्यानंतर जसपाल सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT