Political leaders in Goa face uncertainty amid fast-paced developments and talks of a major cabinet reshuffle Sarkarnama
देश

Goa politics : गोव्यात राजकीय हालचालींनी वेग; निम्मे मंत्रिमंडळ बदलणार?, अनेकांचे धाबे दणाणले!

Goa politics heats up with possible cabinet reshuffle : कामगिरीचा आढावा पक्ष संघटना घेते आणि कोणाला मंत्रिमंडळातून काढावे याचा निर्णय पक्ष घेणार, हे समजल्यानंतर काहीजणांचं टेन्शन वाढलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Rapid Political Movements in Goa : गोव्यात राजकीय हालचालींना आता वेग येत आहे. याला कारण, मंत्रिमंडळात बदलाची दाट शक्यता आहे. शिवाय, भाजप पक्षश्रेष्ठींनी एकंदर मंत्रिमंडळाच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेणेही सुरू केलेले आहे. त्यामुळेच निम्मे मंत्रिमंडळ बदलले जाऊ शकते, अशी चिन्हं दिसत आहेत. तर या शक्यतेने भाजपमधील अनेकजण धास्तावल्याचेही दिसून येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कानपूर, तर गृहमंत्री अमित शहा हे पुंछच्या दौऱ्यावर असल्याने प्रदेशाध्यक्षांची त्यांच्याशी थेट भेट होऊ शकलेली नाही. संघटनेच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी दामू नाईक यांनी चर्चा केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ‘‘पक्षश्रेष्ठींनी या विषयावर शुक्रवारी (३० मे) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे दिल्लीत असलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पुढे कशी राजकीय पावले टाकण्यात येत आहेत, याची कल्पना पक्षश्रेष्‍ठींनी या दोन्ही नेत्यांना दिली आहे. मात्र, ती पावले कोणती, याची नेमकी माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे अनेकजण धास्तावलेले आहेत.’’

एकदा मंत्रिमंडळात समावेश झाला, की मुख्यमंत्र्यांची मर्जी असेपर्यंत मंत्रिमंडळातील स्थान पक्के, असे समजणाऱ्यांना दिल्लीतील घडामोडी समजू लागल्यानंतर धक्के बसू लागले आहेत. कामगिरीचा आढावा पक्ष संघटना घेते आणि कोणाला मंत्रिमंडळातून काढावे याचा निर्णय पक्ष घेणार, हे समजल्यानंतर काहीजणांचं टेन्शन वाढलं आहे.

फर्मागुढीतील ‘UTAA’च्या सभेची गाजही दिल्लीपर्यंत पोहचली आहे. शिस्तप्रिय भाजपला अशाप्रकारे कोणी वेठीस धरू पाहात असेल तर त्याची गय केली जाऊ नये, असे मत दिल्लीत तयार झाले आहे.आणखी काही घटक आसपास वावरत असतील ते पाहा आणि कळवा, असा निरोप घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या यंत्रणेला दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात अशा बेशिस्त मंत्र्यांना खुर्ची गमवावी लागू शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT