Employee Advance Salary :
Employee Advance Salary : Sarkarnama
देश

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ॲडव्हान्स सॅलरी

सरकारनामा ब्यूरो

Employee News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता ॲडव्हान्स सॅलरी देण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगार होण्यापूर्वीच अॅडव्हान्स सॅलरी मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याच्या आधीच अॅडव्हान्स सॅलरी देणारं राजस्थान हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. या बरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय घेतला आहे.

राजस्थान सरकारच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही सुविधा 1 जूनपासून लागू करण्यात आली आहे. 20 हजार रुपयांपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स सॅलरी मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनातील काही रक्कम ॲडव्हान्स सॅलरी म्हणून घेतली तर त्यांच्या पगारातून त्यांनी घेतलेली रक्कम वजा करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या ॲडव्हान्स सॅलरीसाठी कोणत्याही प्रकारचे व्याजदर आकारले जाणार नाही.

दरम्यान, या सुविधेचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. मात्र, राज्यस्थान सरकारने घेतलेला हा निर्णय आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर घेतल्याची टिकाही आता विरोधक करत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT