Ganesh Sugar Factory: गणेश कारखान्याचा वाद पेटला; भागीदारी तत्वावर चालवायला दिल्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन

Ganesh Sugar Factory Election: संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी पाच वाजता गणेश कारखान्याच्या गेट समोर आंदोलन
Ganesh Sugar Factory Election:
Ganesh Sugar Factory Election:Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असतानाच दुसरीकडे गणेश कारखाना भागीदारी तत्वावर चालवायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यान्याला गणेश कारखाना हा पाच वर्षासाठी भागीदारी तत्वावर चालवायला देण्यात आला आहे. हा निर्णय मंगळवारी (दि.30) साखर आयुक्तालयातील बैठकीत झाला. मात्र, यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

Ganesh Sugar Factory Election:
Political News: गणेश सहकारी कारखाना : कोल्हेंच्या भूमिकेकडे लक्ष, विखे-पाटलांसोबत जाणार की विरोधात दंड थोपटणार !

या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी (दि.3 जून 2023) सायंकाळी पाच वाजता गणेश कारखान्याच्या गेट समोर, अर्थात गणेशनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. हा कारखाना बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न असून हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एकजूट व्हा, गणेश परिसराची कामधेनू वाचवण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन संग्राम कोते पाटील यांनी केले आहे.

Ganesh Sugar Factory Election:
Ganesh Sugar Factory : ...तर भागीदारी तत्वावर विखे पाटलांना कारखाना चालवायला कसा दिला ?

गणेश कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असताना करार करून सत्ताधाऱ्यांनी हुकूमशाही सुरू केली असल्याचा आरोप करत निवडणूक प्रकिया सुरु असताना कारखाना भागीदारी तत्वावर कसा दिला जाऊ शकतो?, असा संतप्त सवालही संग्राम कोते यांनी केला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केले होते. गणेश कारखाना पाच वर्षांसाठी भागीदारी तत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भातील घटनाक्रम हा संशयास्पद असल्याचंही थोरातांनी म्हटलं होतं. तर कारखाना भागीदारी तत्वावर पाच वर्षांसाठी चालवायला दिल्याच्या मुद्यांवरून आता राजकारण तापलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com