Year in Search 2021 sarkarnama
देश

भारतीयांनी वर्षभरात काय सर्च केलं?

आंतरराष्ट्रीय यादीसोबत काही देशाच्या याद्या गुगलने (Year in Search 2021)प्रसिद्ध केल्या आहे. यंदा आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि प्रादेशिक ट्रेंड (trending searches) काय होता, हे या यादीवरुन स्पष्ट होते.

सरकारनामा ब्युरो

पुणे : जगभरातून यंदाच्या वर्षी गुगल या सर्च इंजिनवर सर्वाधिक काय पाहिले गेले, याची यादी गुगलने ‘इयर इन सर्च २०२१’ (Year in Search 2021) प्रसिद्ध केली आहे. आंतरराष्ट्रीय यादीसोबत काही देशाच्या याद्या गुगलने प्रसिद्ध केल्या आहे. यंदा आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि प्रादेशिक ट्रेंड (trending searches) काय होता, हे या यादीवरुन स्पष्ट होते.

या वर्षी गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेले लोक म्हणून जी यादी प्रसिद्ध केली आहे, यात ऑलंपिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra), ड्रग्ज प्रकरणातील आर्यन खान (Aryan Khan), अभिनेत्री शहनाज गिल अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra)यांच्या नावाचा समावेश आहे.

गुगलच्या (Google) माहितीनुसार, भारतीयांना टोकियो भारतीयांना इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League), युरो कप (Euro Cup) टोकियो ऑलिम्पिक, पश्चिम बंगालच्या निवडणुका (West Bengal elections), अफगाणिस्तान बातम्या (Afghanistan news) आणि काळ्या बुरशीच्या अपडेट्स जाणून घेण्यात नागरिकांना विशेष कल होता.

सर्वाधिक सर्च झालेल्या देशभरात चित्रपटांमध्ये शेरशाह (Shershaah),जय भीम (Jai Bhim) आणि राधे (Radhe), इटर्नल (Eternals), बेल बॉटम (Bell Bottom) यांचा समावेश होता, तर इंडियन प्रीमियर लीग, CoWIN आणि ICC T20 विश्वचषक हे विषय टेंड्रीगमध्ये होते. टेस्लाचे संस्थापक और मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) हे नाव सर्वाधिक सर्चमध्ये अग्रेसर होते. त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनीच्या शेअरमध्ये झालेली विक्रमी वाढ यामुळे एलन मस्क यांचा सर्वाधिक शोध गुगलवर घेण्यात आला.

जागतिक शोध ट्रेंडमध्ये ‘ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत’, ‘भारत विरुद्ध इंग्लंड’ आणि ‘आयपीएल’ या वर्षी सर्वाधिक शोधले गेलेले शब्द होते, अगदी ‘एनबीए’ आणि ‘युरो २०२१’ हे सुद्धा यादीमध्ये मध्ये सगळ्यात टॅापवर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT