भाजप लढण्यापूर्वीच पराभूत ; पुणे जिल्हा बॅकेच्या संचालकपदी माऊली दाभाडे बिनविरोध

भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने माऊली दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपचा निवडणुकीपूर्वीच पराभव झाल्याची तालुक्यात चर्चा सुरु आहे.

Mauli Dabhade
Mauli Dabhadesatkarnama
Published on
Updated on

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे (Mauli Dabhade) यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी पाचव्यांदा निवड झाली आहे. भाजपच्या तीनही उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने माऊली दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपचा निवडणुकीपूर्वीच पराभव झाल्याची तालुक्यात चर्चा सुरु आहे.

भाजपकडून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या उमेदवारांचे नाव उघड केले नव्हते. अचानक सहा डिसेंबर रोजी शैलजा दळवी, शांताराम काजळे, तुकाराम भोईरकर यांनी उमेदवाराचे अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी हे तीनही अर्ज आल्याने ही भाजपची रणनीती असल्याची चर्चा होती. पण हे तीनही अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालक पदासाठी अ वर्गातून मावळ तालुक्यातून माऊली दाभाडे यांनी अर्ज भरला होता. अ गटातून शेतीविकास सोसायटीचे ५५ मतदार आहेत.

दाभाडे यांनी जिल्हा बॅंकेवर सुमारे तीस वर्ष संचालक म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. बॅंकेच्या महत्वाच्या अंतर्गत असलेल्या महत्वाच्या समित्यांवर काम केले आहे. त्यांनी बॅकेच्या अभ्यासासाठी देश-परदेशात दैारे केले आहेत.


Mauli Dabhade
शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात : चंद्रकांत पाटलांचा टोला

संत तुकाराम सहकारी कारखान्याने संचालक आहेत. तालुक्यात शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा योजना, पाईपलाईन, वीजेच्या मोटारी, ट्रकर, शेतीपुरक अवजारे, पोल्ट्री पर्यटन वाढीसाठी त्यांचे महत्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com