Arif Mohammed Khan speech Sarkarnama
देश

Narendra Modi News : मी मोदींवर टीका करायचो, पण गुजरातमध्ये गेलो अन्..! राज्यपालांनीच दिली जाहीर कबुली...

Arif Mohammed Khan statement : दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे शनिवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खान यांनी हे विधान केले आहे.

Rajanand More

Political statement India : बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी जाहीरपणे एक कबुली दिली आहे. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री होते. या घटनेनंतर राजकारणासह विविध क्षेत्रातून मोदींवर टीकेची झोड उठली होती. त्यामध्ये सध्याचे बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचाही समावेश होता. त्यांनीच तशी कबुली दिली आहे.

गोध्रा हत्याकांडानंतर घडलेल्या घडामोडींनंतर आपण मोदींवर टीका करत होतो, असे राज्यपाल खान यांनी म्हटले आहे. पण त्यानंतर गुजरातमध्ये काही कालावधी घालविल्यानंतर आपली भूमिका पूर्णपणे बदलली, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींची कामाची पध्दत आणि त्यांच्या दुरदृष्टीचेही खान यांनी कौतुक केले आहे.

दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे शनिवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खान यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, मी त्या काळात गुजरातमध्ये चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घालविला नसता आणि विविध समाजातील लोकांशी संवाद साधला नसता तर माझी जुनीच मानसिकता कायम राहिली असती.

गुजरातमध्ये राहिल्यानंतर मला जाणवले की, मोदींनी खूप चुकीच्या पध्दतीने बदनाम केले जात आहे, असे खान यांनी सांगितले. मोदींची प्रशंता करताना राज्यपाल म्हणाले, ते एक दृढ संकल्प करणारे व्यक्त आहेत. ते कधीच थकत नाही आणि नेहमी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. बहुतेक ते सर्वाधिक चुकीचे ठरविण्यात आलेले व्यक्ती असावेत.

जगभरात तीन तलाकला वैध मानले जाते. पण भारतात २०१९ मध्ये पहिल्यांदाच तो संपविण्याचा कायदा करण्यात आला. मोदींच्या महान कार्याबद्दल जग त्यांना ५० वर्षांनंतरही लक्षात ठेवेल, असेही खान यांनी म्हटले आहे. दरम्यान, आरिफ खान हे बिहार राज्याआधी केरळचे राज्यपाल होते. यादरम्यान राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये वारंवार खटके उडत होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT