मुंबई : गुजरात (Gujarat) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील (Chandrakant Patil) उर्फ सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील (Bhavini Patil) ह्या आता महाराष्ट्रातून (Maharashtra) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भाविनी पाटील या जळगाव जिल्ह्यातील मोहाडी येथील ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीच्या (Election) रिंगणात उतरल्या आहेत, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची गुजरातबरोबरच महाराष्ट्रातही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (Gujarat BJP state president's daughter in Maharashtra election arena)
सी. आर. पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील असून ते जळगावचे रहिवासी होते. मात्र, पाटील कुटुंबीय १९८९ पासून गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहेत. पाटील हे जरी गुजरातमध्ये गेले असले तरी त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे. त्याचे बरेचसे नातेवाईक हे महाराष्ट्रातील खानदेशात आहेत. विशेषतः जळगावमध्ये त्यांचे कायम जाणे येणे असते. शिवाय त्यांची कन्या भाविनी पाटील यांचा विवाह जळगावच्या मोहाडी गावातील रामभाऊ पाटील यांच्याशी झाला आहे. त्यामुळे भाविनी या मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
भाविनी पाटील या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या ग्रामस्थांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागणार आहे. निवडून येण्यासाठी भाविनी पाटील यांचे वडिल चंद्रकांत पाटील काय कानमंत्र देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
मोहाडी गावात भाविनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल ग्रामपंचायत निवडणूक लढत आहे. तसेच, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल येत्या ८ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे पाटील यांची गुजरातमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, मुलगा महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरली आहे, त्यामुळे पाटील यांचे गुजरातबरोबरच महाराष्ट्रात लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.