Rahul Gandhi News  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Gujrat High Court: राहुल गांधींना पुन्हा झटका; 'ती' याचिका फेटाळली

Rahul Gandhi News : 'मोदी' आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल होता.

सरकारनामा ब्यूरो

National News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गाँधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. मोदी आडनावाशी संदर्भात केलेल्या विधानाप्रकरणी सुनावलेल्या शिक्षासंदर्भात आज (७ जुलै ) राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे

मोदी काँग्रेसच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी 'मोदी चोर है' अस वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुजरात'चे भाजपचे नेते पुर्णेश यांनी सुरत उच्च न्यायालयात त्यांच्याविरूद्ध मानहाणीचा दावा दाखल केला होता. याच प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधींनी खासदारकी गमावली होती. 

नेमकं काय आहे प्रकरण?

'मोदी' आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल होता. सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना एका फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊन, त्यांना संसद सदस्यावरून अपात्र करण्यात आले होते.

यानंतर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधीविरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना तीन वेळा न्यायालयात हजर राहावे लागले. त्यांनी निवडणुकीच्या सभेत असे वक्तव्य केल्याचे सांगितले होते. या भेटीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करण्यात आले होते.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT