Yeola public Meeting : अजित दादा पवार राज्यातील भाजप प्रणीत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यात छगन भुजबळ देखील सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर निघालेले शरद पवार उद्या पहिली सभा येवला येथे घेत आहे. यावेळी ते भुजबळ यांना थेट आव्हान देतील, त्यामुळे या सभाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar`s First meeting at Yeola in Chhagan Bhujbal`s Constituency)
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेसाठी येवल्यात (Yeola) तयारी करीत असलेल्या नेते, कार्यकर्ते यांना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) समर्थकांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
शरद पवार उद्या (ता.८) दिल्लीहून शिर्डी विमानतळावर येतील. तेथून ते येवल्याला येतील. दुपारी तीनला येवला बाजार समितीच्या मैदैनावरील सभेला संबोधीत करतील. वीस वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांची याच ठिकाणी सभा घेतली होती. त्याची पुनरावृत्ती होत असून शरद पवार यांच्या या सभेसाठी देखील श्री. शिंदे यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या सभेची विशेष चर्चा आहे.
या सभेसाठी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास बनकर यांसह नगरपालिकेतील नगरसेवकांशी त्यांनी संपर्क केला आहे. येवला मतदारसंघात अंबादास बनकर, मारोतराव पवार, नरेंद्र दराडे आणि माणिकराव शिंदे हे चार प्रमुख गट आहेत. यातील किती गट या सभेला एकत्र येतात याला राजकीय संदर्भ आहेत.
श्री. भुजबळ यांचा शिवसेनेचे बाळा नांदगावकर यांनी माझगाव मतदारसंघात पराभव केला होता. त्यानंतर भुजबळ यांच्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता. तेव्हा शरद पवार यांच्या पाठींब्याने भुजबळ यांचे येवल्यात पुर्नवसन करण्यात आले होते. वीस वर्षांनी श्री. भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या बंडात शरद पवार यांना सोडून अजित पवार यांची साथ केल्याने शरद पवार पुन्हा एकदा आपल्या पक्षासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांची पहिली सभा येवल्यात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.