BJP and Congress  Sarkarnama
देश

चंद्रकांत पाटलांचा दे धक्का! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला

सरकारनामा ब्युरो

सुरत : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोडलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार मणिलाल वाघेला (Manilal Vaghela) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट न दिल्यानं ते नाराज होते. मागील वर्षीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव शहरात झालेल्या विजय विश्वास संमेलनात वाघेला यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. वाघेला यांनी 2012 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर वडगावमधून विजय मिळवला होता. नंतर 2017 मध्ये त्यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं होतं. काँग्रेसनं त्यावेळी अपक्ष उमेदवार आणि दलित नेता जिग्नेश मेवानी यांना समर्थन दिले होते. त्यावेळी मेवानी यांनी भाजपच्या आमदाराचा पराभव केला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून वाघेला काँग्रेसमध्ये होते. त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पक्षाचा राजीनामा दिला होता. मेवानी यांच्यामुळे पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मेवानी हे प्रक्षोभक भाषणे करीत असून, दलितांचा राजकारणासाठी वापर करीत असल्याचा आरोप करीत याला वाघेलांनी आक्षेप घेतला होता. मेवानी यांच्यामुळे वाघेला हे अनेक दिवस नाराज होते.

भाजपममध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच वाघेला यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असल्याची टीका करून वाघेला म्हणाले की, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची तक्रार कुणीच ऐकून घेत नाही. आता वडगावमधून मी भाजपचा विजय निश्चित करेन. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मी या भागाचा दौरा करून गावांतील सरपंच आणि अन्य नेत्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपने इथून कुणालाही तिकीट दिले तरी त्याला विजयी करण्याची जबाबदारी माझी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT