Defected TMC 20 Mps and enters in NCPI  Sarkarnama
देश

Yusuf Pathan news : पक्षांतर करणाऱ्या बंडखोर खासदाराला गुजरातमध्ये लॉटरी; तब्बल 14 वर्षे वादात असलेली सरकारी जमीन देण्याचा निर्णय

Yusuf Pathan Vadodara plot, Vadodara Municipal Corporation : वडोदरा येथील पठाण यांच्या घराशेजारील ९७८ चौरस मीटर भूखंड वाटपावरून १४ वर्षे वाद सुरू होता. या भूखंडाचे अंदाजित मूल्य २० कोटी ५३ लाख रुपये एवढे असल्याचे सांगितले जाते.

Rajanand More

Gujarat government land allotment : तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना गुजरातमध्ये लॉटरी लागली आहे. तब्बल १४ वर्षांपासून ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे, ती जमीन पठाण यांना देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. भूखंड पाटपाच्या प्रक्रियेला सरकारने मंजुरी दिली असून तसे आदेश वडोदरा महापालिकेला दिले आहेत.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच पठाण यांच्यासह तृणमूलच्या २० खासदारांनी बंड करत एनसीपीआय या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. या खासदारांनी केंद्रातील एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर काही महिन्यांत घडलेल्या घडामोडींनंतर पठाण यांनी भूखंडावरून सुरू केलेला न्यायालयीन लढा संपला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

वडोदरा येथील पठाण यांच्या घराशेजारील ९७८ चौरस मीटर भूखंड वाटपावरून १४ वर्षे वाद सुरू होता. या भूखंडाचे अंदाजित मूल्य २० कोटी ५३ लाख रुपये एवढे असल्याचे सांगितले जाते. पठाण यांनी २०१२ मध्ये या भूखंडाचे आपल्याला वाटप व्हावे, अशी मागमी वडोदरा महापालिकेला केली होती. त्यानंतर काही दिवसांतच महानगरपालिकेने सार्वजनिक लिलावाशिवाय त्यांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर जमीन वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

राज्य सरकारने २०१४ मध्ये सार्वजनिक लिलावाशिवाय भूखंड वाटप करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावत पठाण यांना धक्का दिला होता. त्यानंतर २०२४ मध्ये महापालिकेने महानगरपालिकेने जमिनीवरील कथित अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. पठाण यांनी या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाच्या एकल खंडपीठाने मागील वर्षी याचिका फेटाळल्यानंतर पठाण यांनी विभागीय खंडपीठाकडे अपील केले होते.

दरम्यानच्या काळात देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. पठाण यांच्यासह तृणमूलचे २० खासदार फुटले आणि त्यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी पठाण यांनी हायकोर्टातील आपली याचिका मागे घेतली.

दुसरीकडे गुजरात सरकारने जमीन वाटपाला मंजुरी दिली. त्यावर महापालिका आयुक्त अरुण बाबू यांनीही शिक्कामोर्तब केले असून आता याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला जाईल, असे सांगितले. समितीच्या मंजुरीनंतर भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, या जमिनीसाठी पठाण यांना पैसे मोजावे लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT