Gokul election result : मंत्री मुश्रीफांच्या लेकाला पराभवाचा झटका देणारा जायंट किलर कोण? सतेज पाटलांच्या उमेदवाराचा नादखुळा

Shashikant Khot, Navid Mushrif, Gokul milk union election : शशिकांत खोत हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून त्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली.
Shashikant Khot, former Kolhapur Zilla Parishad vice-president, defeated Navid Mushrif in the Gokul milk union election.
Shashikant Khot, former Kolhapur Zilla Parishad vice-president, defeated Navid Mushrif in the Gokul milk union election.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur politics : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल म्हणजे विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा पराभव. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत. हा निकाल थेट मुश्रीफांच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला हादरा मानला जात आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांची रणनीती आणि उमेदवारांची अचूक निवड या निवडणुकीत वरचढ ठरली आहे.

जायंटकिलरची चर्चा

महायुतीचे नाविद मुश्रीफ हे इतर मागासवर्ग गटातून गोकुळच्या मैदानात उतरले होते. सतेज पाटील यांनी त्यांच्याविरोधात शशिकांत शामराव खोत यांना उमेदवारी दिली होती. नाविदसह सर्व उमेदवार विजयी होती, असा विश्वास मुश्रीफ यांच्यासह महायुतीचे नेते व्यक्त करत होते.

निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांना मुलालाही विजयी करता आले नाही. खोत या पहिल्यांदाच गोकुळमध्ये एंन्ट्री केलेल्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळे ते जायंट किलर ठरले आहेत. त्यांच्या नावाची आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. सतेज पाटील यांनी नाविद यांच्याविरोधात खोत यांची निवड कशी केली, या चर्चांनाही उधाण आले आहे.

Shashikant Khot, former Kolhapur Zilla Parishad vice-president, defeated Navid Mushrif in the Gokul milk union election.
Satej Patil Gokul election : विधानसभा निवडणुकीपासून 'अजिंक्यतारा' होते सामसूम; आज बंटी पाटलांनी तीन निवडणुकांचा काढला वचपा...

कोण आहेत शशिकांत खोत?

शशिकांत खोत हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून त्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली. नंतर गावचे सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य असे त्यांचे राजकारण राहिले. २०१४ ते २०१७ या काळात त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीही होते.

Shashikant Khot, former Kolhapur Zilla Parishad vice-president, defeated Navid Mushrif in the Gokul milk union election.
BJP assembly ticket : गुन्हेगाराला भाजपकडून लढवायचीय विधानसभा निवडणूक; कोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती...

खोत यांच्या पत्नीही झेडपी सदस्या होत्या. गावामध्ये घराशेजारीचे त्यांचे किराणामालाचे दुकान आहे. हे दुकान म्हणजेच आपले संपर्क कार्यालय असल्याचे त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका व्हिडिओमध्ये सांगितले होते. नाविद यांच्या पराभवानंतर शशिकांत खोत या नावाची जिल्ह्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com