Narendra Modi, Ravindra Jadeja
Narendra Modi, Ravindra Jadeja Sarkarnama
देश

Ribaba Jadeja : “हॅलो, आमदार ! तू खरोखरच यासाठी पात्र आहेस..,असे रवींद्र जडेजा का म्हणाले ?

सरकारनामा ब्युरो

Gujrat Election Ribaba Jadeja : गुजरातच्या निवडणुकीत क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांचा ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. ( Ribaba Jadeja news update)

त्यांना ५७ टक्क्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. आम आदमी पक्षाचे करशनभाई करमूर २३ टक्के मतांसह दुसऱ्या, तर काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा १५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

रिवाबा यांच्या विजयावर रवींद्र जडेजा यांनी समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी रिवाबा यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत त्यांनी फोटो शेअर करीत गुजरातीमध्ये कॅप्शन दिली आहे. रवींद्र जडेजाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपने जामनगरमधून रिवाबा यांना उमेवारी दिली होती.

“हॅलो, आमदार! तू खरोखरच यासाठी पात्र आहेस. जामनगरच्या लोकांचा विजय झाला आहे. सर्वांचे मी आभार मानतो. मी आशापुरा देवीला प्रार्थना करतो की जामनगरमधील सर्व कामं नीट व्हावीत. देवी आम्हाला आशीर्वाद दे,” अशी कॅप्शन जडेजाने या फोटोला दिली आहे.

काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या, रविंद्र जडेजाची बहीण नैनाबा जडेजा काँग्रेसचा प्रचार केला. तर रवींद्र जडेजा यांच्या वडीलांनी रिवाबा यांच्या विरोधात प्रचार केला होता.

“माझ्या भावावर माझे प्रेम कायम आहे. माझी वहिनी भाजपाची उमेदवारी असली तरी वहिनी म्हणून त्यांचा स्वभाव चांगला आहे. आमच्या कुटुंबात आम्हाला स्वातंत्र्य आहे. त्यांना जे काही करायचं ते करु शकतात,” अशी प्रतिक्रिया नैनाबा जडेजा यांनी दिली आहे.

नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी एकदा दिल्लीला गेलेल्या रिवाबा यांनी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदारकीची की, आमदारकीची निवडणूक लढवायची या संभ्रमात त्या आधी होत्या. असे असले तरी त्यांनी 2018 पासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मतदार संघातील अनेक कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग वाढवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT