Gurmeet Ram Rahim Singh Sarkarnama
देश

Gurmeet Ram Rahim Singh : गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार ; निवडणूक आयोगाचा 'पॅरोल'वर निर्णय!

Gurmeet Ram Rahim Singh Parole : निवडणुकीच्या आधी पॅरोल मिळाल्याने हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण...

Mayur Ratnaparkhe

Haryana Vidhansabha Election : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि साध्वीवरील बलात्कार, पत्रकारची हत्या प्रकरणातील आरोपी गुरमीत राम रहीमच्या पॅरोलचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी डेरा प्रमुखास पॅरोल देण्यासाठी हरियाणा सरकारला परवानगी दिली आहे. राम रहीमने २०दिवसांचा पॅरोल मागितला होता, यानंतर निवडणूक आयोगाने हरियाणा सरकारला परवानगी दिली आहे.

डेरा प्रमुख राम रहीमने(Gurmeet Ram Rahim ) २० दिवसांचा पॅरोल मागितला होता. राम रहीमचा पॅरेज अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवला गेला होता. खरंतर राम रहीम या आधी दहावेळा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आलेला आहे. आपल्या दोन शिष्यांशी बलात्काराच्या आरोपात २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीत राम रहीमला २० दिवसांच्या पॅरोलवर तात्पुरती सुटका करण्याची मागणी केली होती. ही मागणी पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी केली गेली आहे.

सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमने हरियाणा विधानसभेच्या मतदानाच्या पाच दिवस आधी २० दिवसांची पॅरोल मागितला होता. पॅरोलबाबत अंतिम निर्णय हरियाणाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना घ्यायचा होता, कारण निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. ८ सप्टेंबर रोजीच २१ दिवसांचा पॅरोलचा कालावधी संपल्यानंतर तो तुरुंगात पोहचला होता.

निवडणुकीच्या आधी पॅरोल मिळाल्याने हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, राज्यातील २० पेक्षा अधिक जागांवर डेरा सच्चा सौदाचा प्रभाव आहे, त्यामुळे राजकीयदृष्ट्या याला महत्त्व आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT